दिनविशेष 08 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
Dinvishesh 08 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 08 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२०२२: कोविड-१९ - जगभरात ४० करोड पेक्षा अधिक लोकांना कोरोना साथीची लागण.
२०२२: ऑलिंपिक - २०२२ हिवाळी ऑलिंपिक बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आले आहे. बीजिंग शहर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिक दोन्हीचे आयोजन करणारे पहिले शहर बनले.
२०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
१९९४: भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.
१९७१: NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
१९६०: पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.
१९४२: दुसरे महायुद्ध जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.
१९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज सुरू झाले.
१९३१: महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले.
१८९९: रँडचा खून करण्याऱ्या;या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या;या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
१८४९: रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.
१७१४: छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.
आज यांचा जन्म
१९६३: मोहम्मद अजहरुद्दीन - भारतीय क्रिकेटपटू
१९४१: जगजित सिंग - भारतीय गझल गायक - पद्म भूषण (निधन: १० ऑक्टोबर २०११)
१९२५: शोभा गुर्टू - शास्त्रीय गायिका (निधन: २७ सप्टेंबर २००४)
१९०९: बाबा बेलसरे - तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (निधन: ३ जानेवारी १९९८)
१९०३: तुक़ू अब्दुल रहमान - मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: ६ डिसेंबर १९९०)
१८९७: डॉ. झाकिर हुसेन - भारताचे ३रे राष्ट्रपती - भारतरत्न, पद्म विभूषण (निधन: ३ मे १९६९)
१८८२: लेफ्टनंट थॉमस सेल्फ्रिज - विमान अपघातात निधन झालेले पहिले व्यक्ती (निधन: १७ सप्टेंबर १९०८)
आज यांची पुण्यतिथी
२०२३: सुबिमल मिश्रा - भारतीय कादंबरीकार (जन्म: २० जून १९४३)
२०२३: इग्नेशियस पॉल पिंटो - भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट (जन्म: १८ मे १९२५)
२०२३: इव्हान सिलायेव - सोव्हिएत युनियनचे माजी पंतप्रधान (जन्म: २१ ऑक्टोबर १९३०)
१९९९: डॉ. इंदुताई पटवर्धन - भारतीय समाजसेविका व आनंदग्रामच्या संस्थापिका (जन्म: १४ मे १९२६)
१९९५: भास्करराव सोमण - भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस ऍडमिरल
१९९४: यशवंत केळकर - भारतीय कवी, कोशकार, इतिहास संशोधक (जन्म: १९ जुलै १९०२)
१९७१: डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी - मुंबईचे पहिले गृहमंत्री (जन्म: ३० डिसेंबर १८८७)
१९३६: चार्ल्स कर्टिस - अमेरिकेचे ३१वे उपाध्यक्ष (जन्म: २५ जानेवारी १८६०)