दिनविशेष 08 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 08 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

जून महिना सुरू झाला आहे, तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 08 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 08 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: मिताली राज - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रनस् करणाऱ्या दिग्गज भारतीय क्रिकेटपटू यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

२०२२: युरोपियन संसदेने २०३५ पर्यंत इंधनावर चालणाऱ्या वाहनांची विक्री बंद करण्यास मत दिले.

२००४: शुक्र संक्रमण - १८८२ नंतरचे पहिले शुक्र संक्रमण.

१९९२: जागतिक महासागर दिन - पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

१९८७: न्यूझीलंड न्यूक्लियर फ्री झोन - न्यूझीलंडच्या सरकारने, निःशस्त्रीकरण आणि शस्त्रास्त्र नियंत्रण कायदा१९८७ अंतर्गत राष्ट्रीय आण्विक मुक्त क्षेत्र स्थापन केले.

१९५३: एफ-५ चक्रीवादळ - अमेरिकेतील मिशिग मध्ये झालेल्या वादळात ११६ लोकांचे निधन, ८४४ लोक जखमी आणि ३४० घरं उद्ध्वस्त झाली.

१९५३: अमेरिका - कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.

१९४८: एअर इंडिया - मुंबई - लंडन विमानसेवा सुरू झाली.

१९४२: दुसरे महायुद्ध - इंपीरियल जपानी नौदलाने सिडनी आणि न्यूकॅसल या ऑस्ट्रेलियन शहरांवर हल्ला केला.

१९४१: दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.

१९४०: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन अल्फाबेट: नार्विक देशामधून मित्र राष्ट्रांना बाहेर काढले.

१९१५: लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.

आज यांचा जन्म

१९७५: शिल्पा शेट्टी - भारतीय अभिनेत्री आणि निर्माते

१९५७: डिंपल कपाडिया - चित्रपट अभिनेत्री

१९५५: टिम बर्नर्स-ली - वर्ल्ड वाईड वेबचे जनक

१९३६: केनिथ गेडीज विल्सन - अमेरिकन भैतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार

१९३२: रे इलिंगवर्थ - इंग्लिश क्रिकेटपटू

१९३०: एम. एन. विजयन - भारतीय पत्रकार, लेखक, आणि शैक्षणिक (निधन: ३ ऑक्टोबर २००७)

१९२५: बार्बरा बुश - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची पत्नी

१९२१: सुहार्तो - इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (निधन: २७ जानेवारी २००८)

१९१७: गजाननराव वाटवे - गायक आणि संगीतकार (निधन: २ एप्रिल २००९)

१९१५: कायर किन्हाण्णा राय - भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी (निधन: ९ ऑगस्ट २०१५)

१९१०: दि. के. बेडेकर - लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक (निधन: २ मे १९७३)

१९०६: सैयद नझीर अली - भारतीय क्रिकेटपटू

१६१२: वु सांगूइ - किंईग चीनी जनरल (निधन: २ ऑक्टोबर १६७८)

आज यांची पुण्यतिथी

६३२: मोहंमद पैगंबर - इस्लाम धर्माचे संस्थापक

२०२२: बिरखा बहादूर मुरिंगला - भारतीय लिंबू भाषेतील लेखक - पद्मश्री (जन्म: १३ एप्रिल १९४३)

१९९८: सानी अबाचा - नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष

१९९५: राम नगरकर - रंगभूमी कलावंत

१८४५: अँड्र्यू जॅक्सन - अमेरिकेचे ७वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ मार्च १७६७)

१८०९: थॉमस पेन - अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक (जन्म: २९ जानेवारी १७३७)

१७९५: लुई १७ वा - फ्रान्सचा राजा (जन्म: २७ मार्च १७८५)

दिनविशेष 08 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
Daily Horoscope 08 June 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांनी अतिविचार करणं टाळावं; पाहा तुमचे भविष्य
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com