दिनविशेष 08 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 08 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 08 April 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 08 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९७४: रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.

१९६२: पश्चिम बंगाल येथील कोलकाता रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना.

१९४५: दुसरे महायुद्ध युरोप विजय दिन - जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.

१९३३: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.

१९३२: पं. विष्णू दिगंबर पलुसकरशिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.

१९१२: पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.

१८९९: क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी.

१८८६: जॉन पेंबरटन यांनी कोका कोला हे पेय पहिल्यांदाच तयार करुन विकले.

आज यांचा जन्म

१९८९: दिनेश पटेल - भारतीय बेसबॉलपटू

१९७०: मायकेल बेव्हन - ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू

१९२५: गुरुराजा श्यामाचार्य अमूर - भारतीय साहित्यिक समीक्षक आणि लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: २८ सप्टेंबर २०२०)

१९१६: रामानंद सेनगुप्ता - भारतीय सिनेमॅटोग्राफर

१९१६: स्वामी चिन्मयानंद सरस्वती - भारतीय अध्यात्मिक गुरू (निधन: ३ ऑगस्ट १९९३)

१९०६: प्राणनाथ थापर - भारताचे माजी भूसेनाप्रमुख

१८८४: हॅरी एस. ट्रूमन - अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २६ डिसेंबर १९७२)

१८५६: पेड्रो लास्कुरेन - मेक्सिकोचे ३८ वे अध्यक्ष, ते एवढ्या ४५ मिनिटांसाठी अध्यक्ष बनले (निधन: २१ जुलै १९५२)

१८२८: हेनरी डूनेंट - रेड क्रॉस संस्थेचे सहसंस्थापक (निधन: ३० ऑक्टोबर १९१०)

आज यांची पुण्यतिथी

१९७४: रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.

१९६२: पश्चिम बंगाल येथील कोलकाता रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना.

१९४५: दुसरे महायुद्ध युरोप विजय दिन - जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.

१९३३: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.

१९३२: पं. विष्णू दिगंबर पलुसकरशिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.

१९१२: पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.

१८९९: क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी.

१८८६: जॉन पेंबरटन यांनी कोका कोला हे पेय पहिल्यांदाच तयार करुन विकले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com