दिनविशेष 09 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 09 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 09 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 09 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००३: संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

१९७३: बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.

१९६९: बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.

१९५१: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.

१९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.

१९००: लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली.

आज यांचा जन्म

१९७०: गोलंदाज ग्लेन मॅकग्रा - ऑस्ट्रेलियन वेगवान

१९५४: केविन वॉर्विक - हे संगणक प्रणाली आणि मानवी मज्जासंस्था यांच्यातील थेट इंटरफेसवरील अभ्यासासाठी ओळखले जाणारे.

१९२९: ए. आर. अंतुले - महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री (निधन: २ डिसेंबर २०१४)

१९२२: सी. पी. कृष्णन नायर - द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे संस्थापक - पद्म भूषण (निधन: १७ मे २०१४)

१९२२: जिम लेकर - इंग्लिश क्रिकेट खेळाडू (निधन: २३ एप्रिल १९८६)

१९१७: होमी जे. एच. तल्यारखान - सिक्कीमचे पहिले राज्यपाल (निधन: २७ जून १९९८)

१९०२: लेओन मब्बा - गॅबॉन देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: २७ नोव्हेंबर १९६७)

१८९७: चार्ल्स किंग्सफोर्ड स्मिथ - पहिले ट्रान्स-पॅसिफिक अमेरिका ते ऑस्ट्रेलिया उड्डाण पूर्ण करणारे ऑस्ट्रेलियन वैमानिक (निधन: ८ नोव्हेंबर १९३५)

१८७४: कवी गोविंद - स्वातंत्र्यशाहीर (निधन: २८ फेब्रुवारी १९२६)

१७७३: हेन्री हॅरिसन - अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम (निधन: ४ एप्रिल १८४१)

१४०४: कॉन्स्टन्टाईन (अकरावा) - शेवटचा बायझेंटाईन सम्राट

आज यांची पुण्यतिथी

२०१०: वॉल्टर फ्रेडरिक मॉरिसन - फ्रिसबीचे संशोधक, अमेरिकन व्यावसायीक (जन्म: २३ जानेवारी १९२०)

२००८: बाबा आमटे - भारतीय कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारे समाजसेवक - पद्म विभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: २६ डिसेंबर १९१४)

२००१: दिलबागसिंग - माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल

२०००: शोभना समर्थ - चित्रपट अभिनेत्री व निर्माती

१९९६: चित्ती बाबू - भारतीय वीणा वादक आणि संगीतकार - संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: १३ ऑक्टोबर १९३६)

१९८९: बालाइ चांद मुखोपाध्याय - भारतीय डॉक्टर, लेखक (जन्म: १९ जुलै १८९९)

१९८१: एम. सी. छागला - न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (जन्म: ३० सप्टेंबर १९००)

१९७७: सर्जी इल्युशीन - इल्युशीन विमान कंपनीचे निर्माते (जन्म: ३० मार्च १८९४)

१९६६: दामूअण्णा जोशी - बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक

१८७१: फ्योदोर दोस्तोवस्की - रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (जन्म: ११ नोव्हेंबर १८२१)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com