1 July 2023 Dinvishesh
1 July 2023 Dinvishesh Team Lokshahi

1 July 2023 Dinvishesh : देशात डिजिटल इंडियाची सुरूवात, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

1 July 2023 Dinvishesh : सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत....
Published by :
Sagar Pradhan

Dinvishesh 1 July 2023 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 1 जुलै या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं

२०१५: डिजिटल इंडिया - या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

२००७: इंग्लंड - देशात सर्व सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.

२००६: किंघाई-तिबेट रेल्वे - सुरवात.

२००३: ५ लाखाहून अधिक लोकांनी हाँगकाँगमध्ये देशद्रोहविरोधी कायदा मंजूर करण्याच्या प्रयत्नांविरुद्ध निषेध केला.

२००२: आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय - स्थापना झाली.

२००१: मायकेल शूमाकर - यांनी फॉर्मुला वन रेसमधले ५०वे विजेतेपद पटकावले.

१९९७: चीन - हाँगकाँग शहर-राज्यावर पुन्हा सार्वभौमत्व सुरू केले आणि १५६ वर्षांच्या ब्रिटीश वसाहतवादी राजवटीचा अंत केला.

१९९७: कुंजराणी देवी - भारतीय वेट लिफ्टर यांना सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत स्थान मिळाले.

१९९१: वॉर्सा करार - अधिकृतपणे संपुष्टात आला.

१९८०: ओ कॅनडा - हे अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रागीत बनले.

१९७९: वॉल्कमन - सोनी कंपनीने हा मुसिक प्लेअर प्रकाशित केला.

१९७२: गे प्राइड मोर्चा - पहिला मोर्चा इंग्लंडमध्ये झाला.

१९६८: वॉशिंग्टन, डी.सी., लंडन आणि मॉस्को येथे ६२ देशांनी अण्वस्त्रांचा प्रसार न करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.

१९६६: कॅनडा - देशात पहिल्या रंगीत टेलिव्हिजनचे प्रक्षेपण सुरु झाले.

१९६४: न. वि. गाडगीळ - यांनी पुणे विद्यापीठाचे ५थे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतले.

१९६३: झिप कोड - अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये झिप कोड वापराची सुरवात करण्यात आली.

१९६२: सोमालिया - देश स्वतंत्र झाला.

१९६२: घाना - देश स्वतंत्र झाला.

१९६१: दत्तो वामन पोतदार - यांनी पुणे विद्यापीठाचे ४थे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतले.

१९६०: रवांडा - देश स्वतंत्र झाला.

१९६०: बुरुंडी - देश स्वतंत्र झाला.

१९५५: स्टेट बँक ऑफ इंडिया - स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट १९५५ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. या आधी बँकचे नाव इंपिरिअल बँक होते.

१९४९: थिरुकोची संस्थान - त्रावणकोर आणि कोचीन ही संस्थाने एकत्र करून थिरुकोची संस्थान निर्माण झाले.

१९४८: स्टेट बँक ऑफ पाकिस्तान - पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँके सुरु.

१९४७: फिलिपाइन्स - फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.

१९४२: दुसरे महायुद्ध - एल अलामीनची पहिली लढाई.

१९३४: मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले.

१९३३: आंधळ्यांची शाळा - या नाटकाचा १ला प्रयोग झाला.

१९३२: ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन - सुरवात.

१९३१: युनायटेड एअरलाइन्स - सुरवात.

१९३१: विली पोस्ट आणि हॅरोल्ड गॅटी हे सिंगल-इंजिन मोनोप्लेन विमानातून संपूर्ण जगाची परिक्रमा करणारे पहिले व्यक्ती बनले.

१९२३: कॅनडा - देशाने सर्व चीनी नागरिकांचे इमिग्रेशन निलंबित केले.

१९२१: चिनी कम्युनिस्ट पक्ष - स्थापना.

१९१९: तरुणभारत - या वृत्तपत्राची बाबूराव ठाकूर यांनी सुरुवात केली.

१९१६: पहिले महायुद्ध - सोम्मेची लढाई: पहिल्या दिवशी ब्रिटिश सैन्याचे किमान १९हजार सैनिकांचे निधन तर ४० हजार सैनिक जखमी.

१९०९: क्रांतिकार कमदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली.

१९०८: एसओएस (SOS) - हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.

१९०३: टूर दी फ्रान्स - पहिल्या सायकल रेसची सुरवात झाली.

१८८१: टेलेफोन कॉल - जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला.

१८७४: टंकलेखक (टाईपरायटर) - पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली.

१८३७: इंग्लंड - जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस सुरूवात झाली.

१६९३: मराठा साम्राज्य - संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.

आज यांचा जन्म

१९७५: कर्नाम मल्लेश्वरी - भारतीय वेटलिफ्टर - पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

१९६६: उस्ताद राशिद खान - रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक - पद्म भूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार

१९५५: तामो मिबांग - भारतीय शैक्षणिक प्रशासक, राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरू (निधन: ६ ऑगस्ट २०२२)

१९४९: वेंकय्या नायडू - भारताचे १३वे उपराष्ट्रपती

१९३८: पंडित हरिप्रसाद चौरसिया - प्रख्यात बासरीवादक - पद्म विभूषण, पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार

१९२९: जेराल्ड एडेलमन - अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (निधन: १७ मे २०१४)

१९१७: श्याम सरन नेगी - भारतीय शिक्षक, देशातील पहिले मतदार (निधन: ५ नोव्हेंबर २०२२)

१९१३: वसंतराव नाईक - महाराष्ट्राचे ४थे मुख्यमंत्री, रोहयो योजनेचे जनक (निधन: १८ ऑगस्ट १९७९)

१८८७: एकनाथ पांडुरंग रेंदाळकर - कवी व संपादक (निधन: २२ नोव्हेंबर १९२०)

१८८२: बिधनचंद्र रॉय - पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री,निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार - भारतरत्न (निधन: १ जुलै १९६२)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: राऊल निकोलाऊ गोन्साल्विस - भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट (जन्म: १५ जून १९२७)

१९९९: फॉरेस्ट मार्स सीनियर - एम अँड एमचे (M&M) संस्थापक (जन्म: २१ मार्च १९०४)

१९८९: ग. ह. पाटील - कवी, शिक्षणतज्ज्ञ

१९६२: बिधनचंद्र रॉय - पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री,निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार - भारतरत्न (जन्म: १ जुलै १८८२)

१९६२: पुरुषोत्तम दास टंडन - राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष - भारतरत्न (जन्म: १ ऑगस्ट १८८२)

१९४१: सर सी. वाय. चिंतामणी - स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार (जन्म: १० एप्रिल १८८०)

१९३८: दादासाहेब खापर्डे - प्रख्यात कायदेपंडित, विद्वान (जन्म: २७ ऑगस्ट १८५४)

१९१२: हॅरिएट क्विंबी - एरो क्लब ऑफ अमेरिका एव्हिएटरचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकी महिला, तसेच इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या महिला पायलट. (जन्म: ११ मे १९७५)

१८६०: चार्ल्स गुडईयर - रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक (जन्म: २९ डिसेंबर १८००)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com