दिनविशेष 10 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 10 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Team Lokshahi

Dinvishesh 10 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 10 मार्च या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९८: भारतीय बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुध्दिबळ स्पर्धा जिंकली.

१९८५: भारताने पाकिस्तानला पराभूत करून मेलबोर्न येथे बेन्सन ऍण्ड हेजेस चॅम्पियनशिप हि क्रिकेट स्पर्धा जिकली.

१९७२: वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

१९५२: केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान ऍंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला.

१८७६: अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांचा सहकारी थॉमस वॅटसन यांच्याशी दुरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला.

१८६२: अमेरिकेत कागदी चलन नोटांची सुरवात झाली.

आज यांचा जन्म

१९७४: बिझ स्टोन - ट्विटरचे सहसंस्थापक

१९५७: ओसामा बिन लादेन - अल कायदा या आतंकी संस्थेचे संस्थापक (निधन: २ मे २०११)

१९४७: किम कॅम्पबेल - कॅनडा देशाच्या पहिल्या महिला आणि १९व्या पंत प्रधान

१९३९: असगर अली इंजिनिअर - भारतीय लेखक (निधन: १४ मे २०१३)

१९२९: मंगेश पाडगावकर - कवी - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण

१९१८: छोटा गंधर्व - स्वरराज, गायक आणि अभिनेते (निधन: ३१ डिसेंबर १९९७)

१८६३: सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) - बडोद्याचे महाराज (निधन: ६ फेब्रुवारी १९३९)

१६२८: मार्सेलिओ माल्पिघी - इटालियन डॉक्टर (निधन: ३० सप्टेंबर १६९४)

आज यांची पुण्यतिथी

१९९९: कुसुमाग्रज - भारतीय लेखक, कवी व नाटककार - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २७ फेब्रुवारी १९१२)

१९८५: कॉन्स्टंटिन चेरेनेन्को - रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव (जन्म: २४ सप्टेंबर १९११)

१९७८: रामकृष्ण रंगा राव - भारतीय वकील आणि राजकारणी, मद्रास प्रेसिडेन्सीचे ६वे मुख्यमंत्री (जन्म: २० फेब्रुवारी १९०१)

१९७१: अप्पासाहेब पटवर्धन - भारतीय समाजसुधारक, कोकणचे गांधी (जन्म: ४ नोव्हेंबर १८९४)

१९५९: बॅ. मुकुंद जयकर - भारतीय कायदेपंडित आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (जन्म: १३ नोव्हेंबर १८७३)

१९५१: किजुरो शिदेहारा - जपान देशाचे ४४वे पंतप्रधान (जन्म: १३ सप्टेंबर १८७२)

१९४०: बुल गाकॉव्ह मिखाईल - रशियन कथा, कादंबरीकार आणि नाटककार

१८९७: सावित्रीबाई फुले - भारतीय पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक (जन्म: ३ जानेवारी १८३१)

१८७२: जोसेफ मॅझिनी - इटालियन स्वातंत्र्यवीर (जन्म: २२ जून १८०५)

दिनविशेष 10 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
Daily Horoscope 10 March 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांनी स्वतःसाठी वेळ काढण्यांची आवश्यकता आहे; पाहा तुमचे भविष्य
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com