दिनविशेष 10 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 10 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 10 April 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 10 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९७: ७.३ मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण मधील सुमारे १५६७ लोक ठार, २३०० लोक जखमी आणि ५०००० लोक बेघर झाले.

१९९४: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.

१९९३: संतोष यादव - दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणाऱ्या पहिलय भारतीय महिला ठरल्या.

१९८१: फ्रान्सवा मितराँ फ्रान्सचे अध्यक्ष बनले.

१९७९: मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.

१९६२: मार्वल कॉमिक्सने द इक्रीडिबल हल्क या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित केला.

१९४०: दुसरे महायुद्ध नेव्हिलचेम्बरलेनने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.

१९३७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.

१९०७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला.

१८२४: लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली.

१८१८: इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

आज यांचा जन्म

१९३७: माणिक गोडघाटे - आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा (निधन: २६ मार्च २०१२)

१९३१: जगदीश खेबूडकर - ज्येष्ठ गीतकार

१९१८: रामेश्वर नाथ काओ - भारतीय रिसर्च अँड ऍनॅलेसिस विंग (RAW) गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष (निधन: २० जानेवारी २००२)

१९१४: ताराचंद बडजात्या - चित्रपट निर्माते, राजश्री प्रॉडक्शनचे संस्थापक (निधन: २१ सप्टेंबर १९९२)

१९०९: बेल्लारी केसवन - भारतीय सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ - पद्मश्री (निधन: १६ फेब्रुवारी २०००)

१८९७: एनर गेरहर्देसन - नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: १९ सप्टेंबर १९८७)

१८८९: नारायण दामोदर सावरकर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार

१८८४: प्रिन्स फर्डिनांड - बव्हेरियाचे राजकुमार (निधन: ५ एप्रिल १९५८)

१८७८: गुस्ताव स्ट्रेसमन - जर्मन राजकारणी, जर्मनीचे चांसलर, नोबेल पारितोषिक विजेते (निधन: ३ ऑक्टोबर १९२९)

१८५५: युकतेश्वर गिरी - भारतीय गुरु आणि शिक्षक (निधन: ९ मार्च १९३६)

१२६५: फुशिमी - जपानचे सम्राट (निधन: ८ ऑक्टोबर १३१७)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: पं. शिवकुमार शर्मा - भारतीय प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार - पद्म विभूषण, पद्मश्री (जन्म: १३ जानेवारी १९३८)

२०२२: लिओनिड क्रावचुक - युक्रेनचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १० जानेवारी १९३४)

२०१५: निनाद बेडेकर - भारतीय इतिहासकार, लेखक (जन्म: १७ ऑगस्ट १९४९)

२००२: कैफी आझमी - गीतकार (जन्म: १४ जानेवारी १९१९)

२००१: सुधाकरराव नाईक - महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री (जन्म: २१ ऑगस्ट १९३४)

२०००: ना. घ. देशपांडे - कवी नागोराव घन (जन्म: २१ ऑगस्ट १९०९)

१९९८: यदुनाथ थत्ते - लेखक, संपादक (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)

१९८१: विनायक माधव दीक्षित पटवर्धन - विनोदी लेखक प्राध्यापक विमादि तथा

१८९९: महादेव विनायक रानडे - रँड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com