दिनविशेष 11 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 11 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 11 April 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 11 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९९: टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.

१९९८: २४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.

१९९६: १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती - एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शीखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.

१९४९: इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.

१८८८: मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.

१८६७: लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.

१८५८: मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.

१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.

१५०२: ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.

आज यांचा जन्म

१९७५: हॅरिएट क्विंबी - एरो क्लब ऑफ अमेरिका एव्हिएटरचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकी महिला, तसेच इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या महिला पायलट. (निधन: १ जुलै १९१२)

१९६०: सदाशिव अमरापूरकर - भारतीय अभिनेते (निधन: ३ नोव्हेंबर २०१४)

१९४६: रॉबर्ट जार्विक - कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट

१९१८: रिचर्ड फाइनमन - अमेरिकन पदार्थवैज्ञानिक - नोबेल पुरस्कार (निधन: १५ फेब्रुवारी १९८८)

१९१६: कॅमिलो जोसे सेला - स्पॅनिश लेखक आणि राजकारणी - नोबेल पुरस्कार (निधन: १७ जानेवारी २००२)

१९१४: ज्योत्स्‍ना भोळे - गानसम्राज्ञी, गायिका आणि अभिनेत्री - लता मंगेशकर पुरस्कार (निधन: ५ ऑगस्ट २००१)

१९१२: हसन मंटो - भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि पटकथालेखक सादत (निधन: १८ जानेवारी १९५५)

१९०४: साल्वादोर दाली - स्पॅनिश चित्रकार (निधन: २३ जानेवारी १९८९)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: पंडित सुख राम - राजकारणी, खासदार आणि मंत्री (जन्म: २७ जुलै १९२७)

२०२२: भगीरथ प्रसाद त्रिपाठी - भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी - पद्मश्री (जन्म: १५ जुलै १९३५)

२०२२: रमेश लटके - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार (जन्म: २१ मे १९७०)

२००९: सरदारिलाल माथादास नंदा - भारतीय नौसेनाधिपती (जन्म: १० ऑक्टोबर १९१५)

२००४: कृष्णदेव मुळगुंद - चित्रकार व नृत्यदिग्दर्शक (जन्म: २७ मे १९१३)

१९९६: ननामदी अझीकीवे - नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: १६ नोव्हेंबर १९०४)

१९८६: फ्रिट्झ पोलार्ड - व्यावसायिक फुटबॉल खेळणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णीय व्यक्ती (जन्म: २७ जानेवारी १८९४)

१९८१: बॉब मार्ली - जमैकन संगीतकार (जन्म: ६ फेब्रुवारी १९४५)

१९८१: ऑड हॅसल - नॉर्वेजियन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: १७ मे १८९७)

१८८९: जॉन कॅडबरी - कॅडबरी कंपनीचे संस्थापक (जन्म: १२ ऑगस्ट १८०१)

१८७१: सर जॉन विल्यम हर्षेल - ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल ऍॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक (जन्म: ७ मार्च १७९२)

१७०८: ज्युल्स हार्डौइन-मन्सार्ट - फ्रेंच वास्तुविशारद, शॅटो डी डॅम्पियर आणि ग्रँड ट्रायनॉनचे रचनाकार (जन्म: १६ एप्रिल १६४६)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com