दिनविशेष 14 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 14 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 14 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 14 मार्च या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१०: ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.

२००१: व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

२०००: कलकत्ता येथील टेक् निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

१९६७: अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडीपार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.

१९५४: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.

१९३१: पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.

आज यांचा जन्म

१९७४: साधना सरगम - पार्श्वागायिका - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

१९७४: रोहित शेट्टी - भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर

१९७२: इरोम चानू शर्मिला - भारतीय कवी

१९६३: ब्रूस रीड - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९६१: उमेश कट्टी - भारतीय राजकारणी, कर्नाटकचे आमदार (निधन: ६ सप्टेंबर २०२२)

१९६१: माईक लाझारीडीस - ब्लॅकबेरी लिमिटेडचे संस्थापक

१९३३: मायकेल केन - ब्रिटिश अभिनेते

१९१४: ली पेटी - पहिली डेटोना ५०० रेस जिकणारे अमेरिकन कार रेसर (निधन: ५ एप्रिल २०००)

१९०८: फिलिप व्हिन्सेंट - विन्सेंट मोटारसायकल कंपनीचे संस्थापक (निधन: २७ मार्च १९७९)

१८९९: के. सी. इर्विंग - इर्विंग ओईल कंपनीचे संस्थापक (निधन: १३ डिसेंबर १९९२)

१८७९: अल्बर्ट आईनस्टाईन - जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: १८ एप्रिल १९५५)

१८७४: एंटोन फिलिप्स - फिलिप्स कंपनीचे सहसंस्थापक (निधन: ७ ऑक्टोबर १९५१)

१८३३: ल्युसी हॉब्स टेलर - अमेरिकन दंतचिकित्सक, दंतचिकित्सा शाळेतून पदवीधर होणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला (निधन: ३ ऑक्टोबर १९१०)

१९३१: प्रभाकर पणशीकर - ख्यातनाम अभिनेते (निधन: १३ जानेवारी २०११)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: स्टीव्ह विल्हाइट - अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, GIF इमेज फॉरमॅटचे निर्माते (जन्म: ३ मार्च १९४८)

२०१०: विंदा करंदीकर - श्रेष्ठ कवी - साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २३ ऑगस्ट १९१८)

२००३: सुरेश भट - कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार (जन्म: १५ एप्रिल १९३२)

१९९८: दादा कोंडके - अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक (जन्म: ८ ऑगस्ट १९३२)

१९३२: जॉर्ज इस्टमन - अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (जन्म: १२ जुलै १८५४)

१९१०: जॉन वालेर - पेपर क्लिपचे शोधक (जन्म: १५ मार्च १८६६)

१८८३: कार्ल मार्क्स - जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते (जन्म: ५ मे १८१८)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com