दिनविशेष 15 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 15 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Team Lokshahi

Dinvishesh 15 January 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 15 जानेवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००१: सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश विकीपिडिया हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.

१९९९: गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९९६: भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.

१९७३: जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.

१९७०: मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.

१९४९: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.

१८८९: द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.

१८६१: एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे जगातील पहिले पेटंट मिळाले.

१७६१: पानिपतचे तिसरे युद्ध संपले.

१५५९: राणी एलिझाबेथ (पहिली यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर ऍबे येथे राज्याभिषेक झाला.

आज यांचा जन्म

१९६३: सुभाष सिंग - भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार (निधन: १६ ऑगस्ट २०२२)

१९५६: मायावती - बहुजन समाज पक्षाच्या नेत्या

१९४७: नितीश नंदी - पत्रकार

१९३१: शरच्चंद्र वासुदेव चिरमुले - मराठी कथाकार

१९२९: मार्टिन ल्युथर किंग - गांधीवादी नेते - नोबेल पुरस्कार (निधन: ४ एप्रिल १९६८)

१९२६: खाशाबा जाधव - ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर (निधन: १४ ऑगस्ट १९८४)

१९२१: बाबासाहेब भोसले - महाराष्ट्राचे ९वे मुख्यमंत्री (निधन: ६ ऑक्टोबर २००७)

१९१७: के.ए. थांगावेलू - भारतीय चित्रपट अभिनेते आणि विनोदकार (निधन: २८ सप्टेंबर १९९४)

१७७९: रॉबर्ट ग्रँट - ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईचे एक संस्थापक

आज यांची पुण्यतिथी

२०२३: राजकुमार मुकर्रम जाह - हैदराबादचे ८वे निजाम (जन्म: ६ ऑक्टोबर १९३३)

२०१४: नामदेव लक्ष्मण ढसाळ - दलित साहित्यिक (जन्म: १५ फेब्रुवारी १९४९)

२०१३: डॉ. शरदचंद्र गोखले - समाजसेवक (जन्म: २९ सप्टेंबर १९२५)

२००७: जेम्स हिलियर - इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार (जन्म: २२ ऑगस्ट १९१५)

२००२: विठाबाई भाऊ (मांग नारायणगावकर) - तमाशा कलावंत

१९९८: गुलझारीलाल नंदा - भारताचा हंगामी पंतप्रधान (जन्म: ४ जुलै १८९८)

१९९४: हरीलाल उपाध्याय - गुजराथी लेखक आणि कवी (जन्म: २२ जानेवारी १९१६)

१९७१: दीनानाथ दलाल - अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार (जन्म: ३० मे १९१६)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com