दिनविशेष 17 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 17 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 17 May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 17 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: भारतीय नौदल - भारतीय बनावटीच्या दोन आघाडीच्या युद्धनौका - INS सुरत आणि INS उदयगिरी यांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हातून बलोकार्पण.

२००४: अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.

१९९५: जॅक शिराक - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

१९९०: समलैंगिकता - जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.

१९८३: लेबानन देशातून सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.

१९६४: टिम हॉर्टन्स इंक. - कंपनीची सुरवात.

१९४९: भारत - भारताचा राष्ट्रकुल (Commonwealth of Nations) मधे राहण्याचा निर्णय.

१९४०: दुसरे महायुद्ध - जर्मन फौजांनी बेल्जियम देशातील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.

१८७२: मराठा साम्राज्य - इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.

१७९२: न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज - सुरवात.

आज यांचा जन्म

१९६६: कुसय हुसेन - सद्दाम हुसेन यांचा मुलगा (निधन: २२ जुलै २००३)

१९५०: जेनेझ ड्रनोव्हसेक - स्लोव्हेनिया देशाचे २रे अध्यक्ष (निधन: २३ फेब्रुवारी २००८)

१९४५: बी. एस. चंद्रशेखर - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री

१९३४: रॉनाल्ड वेन - ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक

१८९७: ऑड हॅसल - नॉर्वेजियन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: ११ मे १९८१)

१८६८: होरॅस डॉज - डॉज मोटर कंपनीचे एक संस्थापक (निधन: १० डिसेंबर १९२०)

१८६५: गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार (निधन: २९ नोव्हेंबर १९५९)

१७४९: डॉ. एडवर्ड जेन्नर - देवीची लस शोधणारे संशोधक (निधन: २६ जानेवारी १८२३)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: शेरिन सेलिन मॅथ्यू - भारतीय ट्रान्सजेंडर मॉडेल

२०१४: सी. पी. कृष्णन नायर - द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे संस्थापक - पद्म भूषण (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)

२०१४: जेराल्ड एडेलमन - अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (जन्म: १ जुलै १९२९)

२०१२: डोना समर - अमेरिकन गायिका (जन्म: ३१ डिसेंबर १९४८)

२००७: टी.के. दोराईस्वामी - भारतीय कवी आणि लेखक (जन्म: २१ ऑगस्ट १९२१)

१९९६: रुसी शेरियर मोदी - कसोटीपटू (जन्म: ११ नोव्हेंबर १९२४)

१९८७: गुन्नार मायर्डल - स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि राजकारणी - नोबेल पारितोषिक (जन्म: ६ डिसेंबर १८९८)

१९७२: रघुनाथ कृष्ण फडके - शिल्पकार

१९५१: विल्यम बर्डवुड - भारतीय-इंग्रजी फील्डमार्शल (जन्म: १३ सप्टेंबर १८६५)

१८८६: जॉन डीयेर - डीयेर एंड कंपनीची स्थापक (जन्म: ७ फेब्रुवारी १८०४)

१८३८: चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड - फ्रान्सचे पंतप्रधान (जन्म: २ फेब्रुवारी १७५४)

१३३६: सम्राट गो-फुशिमी - जपानचे सम्राट (जन्म: ५ एप्रिल १२८८)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com