दिनविशेष 19 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 19 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मार्च महिना सुरू झाला आहे, तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 19 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 19 मार्च रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.

२००१: वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.

१९३२: सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला.

१९३१: अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.

१९२७: निराधारांच्या बहिणीं (Sisters of the Destitute) - या संस्थेची स्थापना.

१८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.

१८२२: बोस्टन, अमेरिका - बोस्टन शहर म्हणून प्रस्थापित करण्यात आले.

१६७४: काशीबाई - शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी

आज यांचा जन्म

१९८२: एड्वार्डो सावेरीन - फेसबुकचे सहसंस्थापक

१९३८: सई परांजपे - बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका

१९३६: ऊर्सुला अँड्रेस - स्विस अभिनेत्री

१९२४: फकीर चंद कोहली - भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक - पद्म विभूषण (निधन: २६ नोव्हेंबर २०२०)

१९२०: जफर फटहॅली - भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक (निधन: ११ ऑगस्ट २०१३)

१९००: जीन फ्रेडरिक जोलिओट - मूलद्रव्याच्या समस्थानिकांचे (Isotopes) संशोधक - नोबेल पुरस्कार (निधन: १४ ऑगस्ट १९५८)

१८९७: दादा चांदेकर - चित्रपट संगीतकार

१८२१: सर रिचर्ड बर्टन - ब्रिटिश लेखक, संशोधक आणि गुप्तहेर (निधन: २० ऑक्टोबर १८९०)

आज यांची पुण्यतिथी

२००८: सर आर्थर सी. क्लार्क - विज्ञान कथालेखक व संशोधक (जन्म: १६ डिसेंबर १९१७)

२००५: जॉन डेलोरेअन - डेलोरेअन मोटर कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: ६ जानेवारी १९२५)

२००२: नरेन ताम्हाणे - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: ४ ऑगस्ट १९३१)

१९९८: इ. एम. एस. नंबूदिरिपाद - केरळचे १ले मुख्यमंत्री (जन्म: १३ जून १९०९)

१९८२: आचार्य कॄपलानी - स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी आणि पर्यावरणवादी (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)

१९८१: एरिक विल्यम्स - त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे पहिले पंतप्रधान (जन्म: २५ सप्टेंबर १९११)

१९७८: एम. ए. अय्यंगार - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: ४ फेब्रुवारी १८९१)

१६४४: गुरु हर गोविंद - शीख धर्माचे ६वे गुरु (जन्म: १९ जून १५९५)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com