दिनविशेष 20 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 20 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मार्च महिना सुरू झाला आहे, तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 20 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 20 मार्च रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१५: सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.

१९५६: ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९१७: महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.

१९१६: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.

१८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.

१७३९: नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.

१६०२: डच इस्ट इंडिया -

आज यांचा जन्म

१९६६: अलका याज्ञिक - पार्श्वगायिका

१९३०: एस. आरासरत्नम - श्रीलंकेचे इतिहासकार आणि शैक्षणिक (निधन: ४ ऑक्टोबर १९९८)

१९२०: वसंत कानेटकर - नाटककार (निधन: ३१ जानेवारी २०००)

१९०८: सर मायकेल रेडग्रेव्ह - ब्रिटिश अभिनेते (निधन: २१ मार्च १९८५)

आज यांची पुण्यतिथी

२०१४: खुशवंत सिंग - भारतीय पत्रकार आणि लेखक (जन्म: २ फेब्रुवारी १९१५)

१९५६: बाळ मर्ढेकर - मराठी नवकाव्याचे प्रणेते - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १ डिसेंबर १९०९)

१९२५: लॉर्ड कर्झन - ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (जन्म: ११ जानेवारी १८५९)

१९१८: लुईस ए. ग्रँट - अमेरिकन वकील आणि जनरल - मेडल ऑफ ऑनर पुरस्कार (जन्म: १७ जानेवारी १८२८)

१७२७: सर आयझॅक न्यूटन - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २५ डिसेंबर १६४२)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com