आज काय घडले : ब्लू जीन्सचा अधिकृत वाढदिवस
DinvisheshTeam Lokshahi

आज काय घडले : ब्लू जीन्सचा अधिकृत वाढदिवस

विष्णुशास्त्री चिपळूनकर यांचा जन्म, बिपिन चंद्र पाल यांची पुण्यतिथी

तरुणांमध्ये कमालीची लोकप्रिय असलेल्या "ब्लू जीन्स" चा अधिकृत वाढदिवस आहे. कारण जीन्स पँटची रचना करणारे लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी निळ्या जीन्सचे पेटंट आजच्याच दिवशी मिळाले.

सुविचार

प्रेम छंदावर करावं,आयुष्य फुलासारखं जगावं,कोमेजून जाण्यापूर्वी सुगंधाचं देणं देऊन जावं.

Dinvishesh
आज काय घडले : मुक्ताबाईंनी घेतली समाधी

आज काय घडलं

 • १४९८ मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा हे भारताच्या कलकत्ता बंदरात दाखल झाले. तीन महिने थांबल्यानंतर ते परत पोर्तुगीजमध्ये परतले.

 • १८७३ मध्ये जीन्स पँटची रचना करणारे लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणे असलेल्या निळ्या जीन्सचे पेटंट घेतले.

 • १९९६ मध्ये देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना 'ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर' हा पुरस्कार जाहीर झाला.

 • २००० मध्ये राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी. एम. सी. बालयोगी यांची एकमताने निवड झाली.

आज यांचा जन्म

 • नोबेल शांतता पुरस्काराने गौरविलेले गेलेले फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ फ्रेडेरिक पॅसी यांचा १८२२ मध्ये जन्म झाला. युरोपमधील युद्धांनंतर सुरू झालेल्या शांतता चळवळीमध्ये पासी यांनी भाग घेतला होता.

 • आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा १९५० मध्ये जन्म झाला. त्यांच्या मराठी भाषेतील अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते.

 • आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचा १९६० मध्ये जन्म झाला.

 • कॅमेरुनचा फूटबॉलपटू रॉजर मिला यांचा १९५२ मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

 • इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांचे १७६६ मध्ये निधन झाले. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या माळवा (मध्य प्रदेश) प्रांताचे पहिले सुभेदार होते.

 • लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचे १९३२ मध्ये निधन झाले. वंगभंग, स्वदेशी व बहिष्कराचे प्रचंड आंदोलन करुन जनजागृती केली.

 • भारतीय मानववंशशास्त्रज्ञ लीला दुबे यांचे २०१२ मध्ये निधन झाले.

 • रिमोट कंट्रोलचे शोधक यूजीन पॉली यांचे २०१२ मध्ये निधन झाले. जेनिथ इलेक्ट्रॉनिक्समध्ये कार्यरत असतांना त्यांनी पहिले वायरलेस रिमोट कंट्रोल बनवले होते.

Lokshahi
www.lokshahi.com