Dinvishesh
DinvisheshTeam Lokshahi

21 August 2023 Dinvishesh : दिनविशेष 21 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Sagar Pradhan
Published on

Dinvishesh 21 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 21 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.


आज काय घडलं?

२०२२: भारत - भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे किमान ५० लोकांचे निधन.

१९९३: मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.

१९९१: लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.

१९११: पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.

१८८८: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.

आज यांचा जन्म

१९८६: उसेन बोल्ट - जमैकाचा धावपटू

१९८१: टायलर विंकलेवॉस - कनेक्ट्यूचे सहसंस्थापक

१९८१: कॅमेरॉन विंकल्वॉस - कनेक्ट्यूचे सहसंस्थापक

१९७३: सर्गेइ ब्रिन - गूगलचे सहसंस्थापक

१९६३: मोहम्मद (सहावा) - मोरोक्कोचा राजा

१९६१: व्ही. बी. चन्द्रशेखर - भारताचा फिरकी गोलंदाज

१९३९: फेस्टस मोगे - बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष

१९३७: डोनाल्ड डेवार - स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री (निधन: ११ ऑक्टोबर २०००)

१९३४: सुधाकरराव नाईक - महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री (निधन: १० मे २००१)

१९२७: बी. सत्य नारायण रेड्डी - भारतीय वकील आणि राजकारणी, पश्चिम बंगालचे १९वे राज्यपाल (निधन: ६ ऑक्टोबर २०१२)

१९२४: श्रीपाद दाभोळकर - गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ (निधन: ३० एप्रिल २००१)

१९२१: टी.के. दोराईस्वामी - भारतीय कवी आणि लेखक (निधन: १७ मे २००७)

१९१८: सिकंदर बख्त - भारतीय राजकारणी, केंद्रीय परराष्ट्रमंत्री (निधन: २३ फेब्रुवारी २००४)

१९१०: नारायण बेंद्रे - भारतीय चित्रकार - पद्म भूषण, पद्मश्री (निधन: १८ फेब्रुवारी १९९२)

१९०९: ना. घ. देशपांडे - कवी नागोराव घन (निधन: १० मे २०००)

१९०७: पी. जीवनवंश - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: १८ जानेवारी १९६५)

१९०५: बिपीन गुप्ता - भारतीय अभिनेते आणि निर्माते (निधन: ९ सप्टेंबर १९८१)

१८७१: गोपाळ कृष्ण देवधर - भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य (निधन: १७ नोव्हेंबर १९३५)

१७८९: ऑगस्टिन कॉशी - फ्रेन्च गणितज्ञ (निधन: २३ मे १८५७)

१७६५: विल्यम (चौथा) - इंग्लंडचा राजा (निधन: २० जून १८३७)

आज यांची पुण्यतिथी

२००७: एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन - अमेरिकेतील पहिल्या महिला यूएस आर्मी ब्रिगेडियर जनरल (जन्म: ३ नोव्हेंबर १९१८)

२००६: बिस्मिला खान - ख्यातनाम सनईवादक - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: २१ मार्च १९१६)

२००५: मार्कस श्मक - फ्रिट्झ विंटरस्टेलर, कर्ट डिमबर्गर, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक (जन्म: १८ एप्रिल १९२५)

२००४: सच्चिदानंद राऊत - भारतीय उडिया भाषा कवी (जन्म: १३ मे १९१६)

२००१: शरद तळवलकर - भारतीय मराठी विनोदी अभिनेते (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)

२००१: शं. ना. अंधृटकर - मराठी रंगभूमीचे वारकरी

२०००: निर्मला गांधी - समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा

२०००: विनायकराव कुलकर्णी - स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी

१९९५: सुब्रमण्यम चंद्रशेखर - भारतीय-अमेरिकन खगोल भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: १९ ऑक्टोबर १९१०)

१९९१: गोपीनाथ मोहंती - ओरिया साहित्यिक - ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २० एप्रिल १९१४)

१९८१: काकासाहेब कालेलकर - गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ (जन्म: १ डिसेंबर १८८५)

१९८१: काका कालेलकर - भारतीय स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, पत्रकार - पद्म विभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १ डिसेंबर १८८५)

१९७८: विनू मांकड - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: १२ एप्रिल १९१७)

१९७७: प्रेमलीला ठाकरसी - एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू

१९७६: पांडुरंग नाईक - प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर (जन्म: १३ डिसेंबर १८९९)

१९७६: पांडुरंग सातू नाईक - छायालेखक (cinematographer) (जन्म: १३ डिसेंबर १८९९)

१९४७: इटोर बुगाटी - बुगाटी कंपनीचे संस्थापक (जन्म: १५ सप्टेंबर १८८१)

१९४०: लिऑन ट्रॉट्स्की - रशियन क्रांतिकारक (जन्म: ७ नोव्हेंबर १८७९)

१९३१: पं. विष्णू दिगंबर पलुसकर - संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक (जन्म: १८ ऑगस्ट १८७२)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com