दिनविशेष 21 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 21 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

जून महिना सुरू झाला आहे, तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 21 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 21 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१५: जागतिक योग दिन - सुरवात.

२००६: नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले.

२००४: स्पेसशिपवन SpaceShipOne - हे स्पेसफ्लाइट साध्य करणारे पहिले खाजगी स्पेसप्लेन बनले.

१९९९: मार्क वॉ - हे विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारे ४थे खेळाडू ठरले.

१९९८: फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने फ्रिट्झ-५ या संगणकाचा पराभव केला.

१९९५: रश्मी मयूर - यांना पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ अमेरिकेतील द युनिटी इन योग इंटरनॅशनल या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.

१९९२: डॉ. रघुनाथ माशेलकर - यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर.

१९९१: पी. व्ही. नरसिम्हा राव - भारताचे ९वे पंतप्रधान बनले.

१९८९: अमेरिका - सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.

१९६३: कार्डिनल जियोव्हानी बॅटिस्टा मॉन्टिनी - यांची पोप पॉल (सहावे) म्हणून निवड.

१९६१: अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे यंत्र विकसित केले.

१९५७: एलेन फेअरक्लॉ - यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

१९४९: राजस्थान उच्च न्यायालय - स्थापना.

१९४८: चक्रवर्ती राजगोपालाचारी - पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले.

१९४५: दुसरे महायुद्ध - ओकिनावाची लढाई: संपली.

१९४२: दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने किमान ३३ हजार मित्र राष्ट्रांच्या सैन्याला कैद केले.

१९४२: दुसरे महायुद्ध - जपानी पाणबुडीने अमेरिकेच्या मुख्य भूमीवर हल्ला केला.

१९४०: दुसरे महायुद्ध - इटलीने फ्रान्सवर अयशस्वी आक्रमण सुरू केले.

१८९८: अमेरिका - देशाने स्पेनकडून ग्वाम हा प्रांत ताब्यात घेतला.

१७८८: अमेरिका - न्यू हॅम्पशायर ९वे राज्य बनले.

आज यांचा जन्म

१९६७: पियरे ओमिदार - ईबे (eBay)चे स्थापक

१९५३: बेनझीर भूट्टो - पाकिस्तानच्या १३व्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान (निधन: २७ डिसेंबर २००७)

१९५२: जेरमी कोनी - न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

१९४१: अलॉयसियस पॉल डिसोझा - भारतीय बिशप

१९२३: सदानंद रेगे - मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक

१९१६: सुरेन्द्रनाथ कोहली - भारताचे ९वे नौदल प्रमुख (निधन: २१ जानेवारी १९९८)

१९१२: विष्णू प्रभाकर - भारतीय लेखक व नाटककार - पद्मा भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: ११ एप्रिल २००९)

१७८१: सिमिओन-डेनिसपॉइसॉन - फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ

आज यांची पुण्यतिथी

२०२२: पॉलीकार्पस झकारियास - भारतीय जेकोबाइट सीरियन ऑर्थोडॉक्स प्रीलेट (जन्म: २३ जुलै १९७०)

२०२०: राजिंदर गोयल - भारतीय क्रिकेटपटू, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे (जन्म: २० सप्टेंबर १९४२)

२०२०: जीत सिंग नेगी - आधुनिक घरवल लोकसंगीताचे जनक (जन्म: २ फेब्रुवारी १९२५)

२०१२: सुनील जना - भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार - पद्मा भूषण, पद्मश्री (जन्म: १७ एप्रिल १९१८)

२०१२: भालचंद्र दत्तात्रय खेर - लेखक व पत्रकार (जन्म: १२ जून १९१७)

२००३: लिऑन युरिस - अमेरिकन कादंबरीकार (जन्म: ३ ऑगस्ट १९२४)

१९८४: अरुण सरनाईक - मराठी चित्रपट अभिनेते, संगीतकार (जन्म: ४ ऑक्टोबर १९३५)

१९७०: सुकर्णो - इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती (जन्म: ६ जून १९०१)

१९५७: योहानेस श्टार्क - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक

१९४०: केशव बळीराम हेडगेवार - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (जन्म: १ एप्रिल १८८९)

१९२८: द्वारकानाथ पितळे - सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार (जन्म: ३ एप्रिल १८८२)

१८९३: लिलँड स्टॅनफोर्ड - अमेरिकन उद्योगपती, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक

१८९३: अमासा लेलंड स्टॅनफर्ड - अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक (जन्म: ९ मार्च १८२४)

१८७६: अँटोनियो लोपेझ डी सांता अण्णा - मेक्सिको देशाचे ८वे अध्यक्ष (जन्म: २१ फेब्रुवारी १७९४)

१८७४: अँडर्सयोनास अँग्स्ट्रॉम - स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com