दिनविशेष 21 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 21 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मार्च महिना सुरू झाला आहे, तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 21 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 21 मार्च रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००६: सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.

२००३: जळगाव महानगरपालीकेची स्थापना.

२०००: फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.

१९९०: नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९८०: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.

१९७७: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.

१९३५: शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.

१८७१: ऑटो व्हॉन बिस्मार्क हे जर्मनीचा चॅन्सेलर बनला.

१८५८: इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनीझाशीस वेढा दिला.

१६८०: शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.

१५५६: ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणाऱ्या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.

आज यांचा जन्म

१९४८: स्कॉट फॅहलमन - संगणक शास्त्रज्ञ, :-) आणि :-( या पहिल्या इमोटीकॉन्सचे निर्माते

१९२३: निर्मला श्रीवास्तव - भारतीय अध्यात्मिक गुरु, सहज योगच्या संस्थापिका (निधन: २३ फेब्रुवारी २०११)

१९१६: बिस्मिला खान - ख्यातनाम सनईवादक - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २१ ऑगस्ट २००६)

१९०४: फॉरेस्ट मार्स सीनियर - एम अँड एमचे (M&M) संस्थापक (निधन: १ जुलै १९९९)

१८८७: मानबेंद्रनाथ रॉय - भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक, क्रांतिकारक (निधन: २६ जानेवारी १९५४)

१८४७: बाळाजी प्रभाकर मोडक - कालजंत्रीकार (निधन: २ डिसेंबर १९०६)

आज यांची पुण्यतिथी

२०१०: बाळ गाडगीळ - अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक (जन्म: २९ मार्च १९२६)

२००५: दिनकर द. पाटील - चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (जन्म: ६ नोव्हेंबर १९१५)

२००३: शिवानी - भारतीय लेखक (जन्म: १७ ऑक्टोबर १९२३)

२००१: चुंग जू-युंग - ह्युंदाई मोटर कंपनीचे संस्थापक (जन्म: २५ नोव्हेंबर १९१५)

१९८५: सर मायकेल रेडग्रेव्ह - ब्रिटिश अभिनेते (जन्म: २० मार्च १९०८)

१९७३: यशवंत रामकृष्ण दाते - कोशकार (जन्म: १७ एप्रिल १८९१)

१९७३: शंकर घाणेकर - नटवर्य

१८४३: ग्वाडालुपे व्हिक्टोरिया - मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती (जन्म: २९ सप्टेंबर १७८६)

०२३५: अलेक्झांडर सेव्हरस - रोमन सम्राट (जन्म: १ ऑक्टोबर २०८)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com