Dinvishesh
DinvisheshTeam Lokshahi

24 July 2023 Dinvishesh : 24 जुलै दिनविशेष, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

24 July 2023 Dinvishesh : सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
Sagar Pradhan

Dinvishesh 24 July 2023 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 24 जुलै या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.


आज काय घडलं


२०१९: बोरिस जॉन्सन - युनायटेड किंगडमचे ७७वे पंतप्रधान बनले.

२०००: विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम - ह्या भारताच्या पहिला महिला ग्रँडमास्टर बनल्या.

१९९७: महाश्वेतादेवी - यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

१९८७: हुल्डा क्रुक्स - यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी जपान मधील सर्वोच्च शिखर माउंट फुजीवर चढाई केली. त्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरल्या.

१९७७: लिबिया-इजिप्शियन युद्ध - समाप्ती.

१९६९: अपोलो प्रोग्राम - अपोलो ११ अंतराळयान प्रशांत महासागरात सुरक्षितपणे खाली पडले.

१९६९: अपोलो ११ - चंद्र मोहिमेनंतर हे अंतराळयान पृथ्वीवर सुखरूप परतले.

१९४३: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन गोमोरा: सुरू झाले, नोव्हेंबरमध्ये ऑपरेशन संपेपर्यंत किमान ३० हजार हुन अधिक लोकांचे निधन.

१९४३: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन गोमोरा: दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले.

१९३१: पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.

१९२३: पहिले महायुद्ध - लुझनचा करार: आधुनिक तुर्कस्तानच्या सीमा निश्चित करणाऱ्यासाठी ग्रीस, बल्गेरिया आणि पहिल्या महायुद्धात लढलेल्या इतर देशांनी स्वित्झर्लंडमध्ये या करारावर स्वाक्षरी केली.

१९११: हायराम बिंगहॅम - ३रे यांनी पेरूतील माचुपिच्चू हे प्राचीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.

१८४७: रिचर्ड मार्च हो - यांनी रोटरी-प्रकाराच्या प्रिंटिंग प्रेसचे पेटंट घेतले.

१८२३: चिली - देशात गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.

१७०४: ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला.

१५६७: स्कॉटलंड - राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे १ वर्षाचा जेम्स (सहावा) स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला.

आज यांचा जन्म

१९६९: जेनिफर लोपेझ - अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका

१९४७: जहीर अब्बास - पाकिस्तानी फलंदाज

१९४५: अझीम प्रेमजी - विप्रो कंपनीचे संस्थापक अध्यक्ष - पद्म विभूषण, पद्म भूषण

१९३७: मनोज कुमार - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते - पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

१९२८: केशुभाई पटेल - गुजरातचे १०वे मुख्यमंत्री (निधन: २९ ऑक्टोबर २०२०)

१९११: पन्नालाल घोष - बासरीवादक संगीतकार (निधन: २० एप्रिल १९६०)

१८९७: अमेलिया इअरहार्ट - अटलांटिक महासागर एकट्याने पार करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक (निधन: ५ जानेवारी १९३९)

१८५१: फ्रेडरिक शॉटकी - जर्मन गणितज्ञ

१७८६: जोसेफ निकोलेट - फ्रेंच गणितज्ञ संशोधक

आज यांची पुण्यतिथी

२०२०: अमला शंकर - भारतीय नृत्यांगना (जन्म: २७ जून १९१९)

२०१७: हर्षिदा रावल - भारतीय गुजराती पार्श्वगायिका

२०१२: रॉबर्ट लिडले - सीटी स्कॅनचे शोधक (जन्म: २८ जुन १९२६)

१९८०: पीटर सेलर्स - इंग्लिश विनोदी अभिनेते आणि गायक (जन्म: ८ सप्टेंबर १९२५)

१९८०: उत्तम कुमार - बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते (जन्म: ३ सप्टेंबर १९२७)

१९७४: सर जेम्स चॅडविक - ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक - नोबेल पुरस्कार (जन्म: २० ऑक्टोबर १८९१)

१९७०: पीटर दि नरोन्हा - भारतीय उद्योगपती (जन्म: १९ एप्रिल १८९७)

११२९: शिराकावा - जपानी सम्राट (जन्म: ७ जुलै १०५३)

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com