दिनविशेष 26 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 26 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

जून महिना सुरू झाला आहे, तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

Dinvishesh 26 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 26 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०००: पी. बंदोपाध्याय - या भारतीय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.

१९९९: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन, माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.

१९९७: हॅरी पॉटर कादंबरी मालिका - जे. के. रोलिंग यांनी हॅरी पॉटर फिलॉसॉफर्स स्टोन हि मालिकेतील पहिली कादंबरी प्रकाशित केली.

१९७९: मुहम्मद अली - यांनी व्यायवसायिक बॉक्सिंग मधून निवृत्ती घेतली.

१९७७: एल्व्हिस प्रेस्ली - यांचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.

१९७५: सुरक्षिततेसाठी राष्ट्रपति फक्रुद्दिन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी घोषीत केली.

१९७४: युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड (बारकोड) - वस्तू विकण्यासाठी पहिल्यांदाच बारकोडचा उपयोग करण्यात आला.

१९७४: अमेरिका - अमेरिकेत सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.

१९६८: पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.

१९६०: सोमालीलँड - देशाने स्वातंत्र्य मिळवले.

१९६०: मादागास्कर - देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९५९: स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले.

१९४४: दुसरे महायुद्ध - ओसुची लढाई: नाझी जर्मनी आणि पोलिश सैन्यातील सर्वात मोठी लढाई सुरु.

१९३६: फॉके-वुल्फ Fw 61 - या पहिल्या व्यावहारिक हेलिकॉप्टरचे प्रारंभिक उड्डाण झाले.

१९०६: ग्रँड प्रिक्स मोटर रेस - पहिली ग्रँड प्रिक्स मोटर रेस ले मॅन्स येथे आयोजित करण्यात आली.

१८१९: सायकलचे पेटंट देण्यात आले.

१७२३: रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.

आज यांचा जन्म

१९५१: गॅरी गिल्मोर - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९४२: सारथी - भारतीय अभिनेते (निधन: १ ऑगस्ट २०२२)

१९३७: रॉबर्ट कोलमन रिचर्डसन - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: १९ फेब्रुवारी २०१३)

१९२६: महेंद्र भटनागर - भारतीय कवी (निधन: २७ एप्रिल २०२०)

१९१४: शापूर बख्तियार - ईराणचे ७४ वे पंतप्रधान (निधन: ६ ऑगस्ट १९९१)

१९०८: साल्वादोर ऍलेंदे - चिली या लॅटिन अमेरिकन देशाचे अध्यक्ष बनणारे पहिले मार्क्सवादी व्यक्ति (निधन: ११ सप्टेंबर १९७३)

१९०६: एम. पी. शिवग्नम - भारतीय लेखक व राजकारणी - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: ३ ऑक्टोबर १९९५)

१९०६: मा. पो. सि. - भारतीय लेखक आणि राजकारणी (निधन: ३ ऑक्टोबर १९९५)

१८९२: पर्ल एस. बक - अमेरिकन लेखिका - नोबेल पुरस्कार (निधन: ६ मार्च १९७३)

१८९२: बेसी कोलमन - आंतरराष्ट्रीय वैमानिकाचा परवाना मिळवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन महिला वैमानिक (निधन: ३० एप्रिल १९२६)

१८८८: बालगंधर्व - गायक व नट - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: १५ जुलै १९६७)

१८७३: गौहर जान - भारतातील ७८ rpm रेकॉर्डवर संगीत रेकॉर्ड करणाऱ्या पहिल्या कलाकारांपैकी एक (निधन: १७ जानेवारी १९३०)

१८७३: अँजेलिना येओवार्ड - गायिका व नर्तिका (निधन: १७ जानेवारी १९३०)

१८२४: लॉर्ड केल्व्हिन - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (निधन: १७ डिसेंबर १९०७)

१८२१: बार्टोलोमे मिटर - अर्जेंटिना देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष (निधन: १९ जानेवारी १९०६)

१६९४: जॉर्ज ब्रांड - स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ

आज यांची पुण्यतिथी

३६३: ज्युलियन - रोमन सम्राट

२०२२: व्ही. कृष्णमूर्ती - भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: १४ जानेवारी १९२५)

२००५: एकनाथ सोलकर - अष्टपैलू क्रिकेटपटू (जन्म: १८ मार्च १९४८)

२००४: यश जोहर - भारतीय चित्रपट निर्माते (जन्म: ६ सप्टेंबर १९२९)

२००१: व. पु. काळे - लेखक व कथाकथनकार (जन्म: २५ मार्च १९३२)

१९८०: आप्पा पेंडसे - पत्रकार

१९५५: एंगलबर्ट जशचा - मानव-सक्षम विमानांचे निर्मिते (जन्म: १ सप्टेंबर १८९५)

१९४३: कार्ल लॅन्ड्स्टायनर - ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: १४ जून १८६८)

१८१०: जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र - हॉट एअर बलूनचे सहसंशोधक

१५३१: वल्लभाचार्य - पुष्टि पंथाचे संस्थापक (जन्म: २७ एप्रिल १४७९)

दिनविशेष 26 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
Daily Horoscope 26 June 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांना बसणार आर्थिक फटका; पाहा तुमचे भविष्य
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com