दिनविशेष 27 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 27 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

एप्रिल महिना सुरू झाला आहे, तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 27 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 27 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०११: अमेरिकेच्या दक्षिण भागात टोनँडोंचा उद्रेक त्यात ३०० ठार झाले.

२००५: एअरबस ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

१९९९: एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली.

१९९२: बॅटी बूथरायड ह्या ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या लोकप्रतिनिधी निवडून येणारया पहिल्या महिला ठरल्या.

१९७४: राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली.

१९६१: सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९४१: दुसरे महायुद्ध - जर्मन फौजांनी अथेन्समधे प्रवेश केला.

१९०८: चौथ्या ऑलिम्पिक खेळांना लंडन येथे सुरुवात झाली.

१८५४: पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.

आज यांचा जन्म

१९७६: फैसल सैफ - पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक

१९२७: कोरेटा स्कॉट किंग - मार्टिन ल्युथर किंग यांची पत्नी

१९२०: मणिभाई देसाई - भारतीय ग्रामीण विकासाचे प्रणेते, कार्यकर्ते - पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: १४ नोव्हेंबर १९९३)

१८८३: मामा वरेरकर - नाटककार (निधन: २३ सप्टेंबर १९६४)

१८२२: युलिसीस एस. ग्रॅन्ट - अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २३ जुलै १८८५)

१७९१: सॅम्युअल मोर्स - मोर्स कोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार (निधन: २ एप्रिल १८७२)

१५९३: मुमताज महल - शाहजहानची पत्नी (निधन: १७ जून १६३१)

१४७९: वल्लभाचार्य - पुष्टि पंथाचे संस्थापक (निधन: २६ जून १५३१)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: महेंद्र भटनागर - भारतीय कवी (जन्म: २६ जून १९२६)

२०१७: विनोद खन्ना - भारतीय अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार - दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: ६ ऑक्टोबर १९४६)

२००९: फिरोज खान - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २५ सप्टेंबर १९३९)

२००२: रुथ हँडलर - बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुलीच्या जनक (जन्म: ४ नोव्हेंबर १९१६)

१९८९: कोनसुके मात्सुशिता - पॅनासोनिकचे संस्थापक (जन्म: २७ नोव्हेंबर १८९४)

१९८०: विठ्ठलराव विखे पाटील - सहकारमहर्षी - पद्मश्री (जन्म: २९ ऑगस्ट १९०१)

१९७२: घवानी एनक्रमाह - घाना देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २१ सप्टेंबर १९०९)

१८९८: शंकर बाळकृष्ण दीक्षित - ज्योतिर्विद (जन्म: २१ जुलै १८५३)

१५२१: फर्डिनांड मॅगेलन - पोर्तुगीज शोधक

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com