दिनविशेष 28 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 28 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 28 January 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 28 जानेवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: कोविड-१९ - जगभरात लासिकरणाची संख्या १००० करोड पेक्षा जास्त.

२०१०: १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.

१९८६: चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.

१९७७: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९६१: एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.

१९४२: दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.

१६४६: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.

आज यांचा जन्म

१९५५: निकोलस सारकोझी - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष

१९४९: जेर्झी स्काझाकिएल - पोलिश स्पीडवे रायडर, विश्वविजेते (निधन: १ सप्टेंबर २०२०)

१९३७: सुमन कल्याणपूर - चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा

१९३०: पं. जसराज - मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक

१९२५: डॉ. राजा रामण्णा - शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (निधन: २३ सप्टेंबर २००४)

१९०५: एलेन फेअरक्लॉ - कॅनडा देशातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री (निधन: १३ नोव्हेंबर २००४)

१८९९: के. एम. करिअप्पा - स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख, फील्डमार्शल (निधन: १५ मे १९९३)

१८६५: लाला लजपत राय - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पंजाब केसरी (निधन: १७ नोव्हेंबर १९२८)

१८६५: कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग - फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: २२ सप्टेंबर १९५२)

१४५७: हेन्री (सातवा) - इंग्लंडचा राजा (निधन: २१ एप्रिल १५०९)

आज यांची पुण्यतिथी

२००७: ओ. पी. नय्यर - संगीतकार (जन्म: १६ जानेवारी १९२६)

१९९७: पांडुरंग सुखात्मे - भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ - पद्म भूषण (जन्म: २७ जुलै १९११)

१९९६: बर्न होगार्थ - अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ (जन्म: २५ डिसेंबर १९११)

१९८४: सोहराब मेहेरबानजी मोदी - भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते (जन्म: २ नोव्हेंबर १८९७)

१८५१: बाजीराव पेशवे (दुसरे) - (जन्म: १० जानेवारी १७७५)

१६१६: दासोपंत - संत (जन्म: २४ सप्टेंबर १५५१)

१५९६: फ्रान्सिस ड्रेक - एकाच मोहिमेत जगाची प्रदक्षिणा पूर्ण करणारे इंग्रजी एक्सप्लोरर

१५४७: हेन्री (आठवा) - इंग्लंडचा राजा (जन्म: २८ जून १४९१)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com