दिनविशेष 28 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 28 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

जून महिना सुरू झाला आहे, तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 28 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 28 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९८: संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली.

१९९७: मुष्टियुद्धात इव्हांडर होलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माइक टायसनला निलंबित करून होलिफील्डला विजेते घोषित करण्यात आले.

१९९४: विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली.

१९८७: लष्करी इतिहासात प्रथमच, इराकी युद्ध विमानांनी इराणच्या सरदश्त शहरावर बॉम्बफेक करून रासायनिक हल्ल्यासाठी नागरी लोकसंख्येला लक्ष्य करण्यात आले.

१९७८: अमेरिका - सर्वोच्च न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.

१९७२: दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला.

१९५०: कोरियन युद्ध - बोडो लीग हत्याकांड: ६० हजार ते २ लाख संशयित कम्युनिस्ट सहानुभूतीधारकांना फाशी देण्यात आली.

१९४८: डिक टर्पिन - यांनी विन्स हॉकिन्स यांचा पराभव करून पहिले कृष्णवर्णीय ब्रिटिश बॉक्सिंग चॅम्पियन बनले.

१९४२: दुसरे महायुद्ध - ऑपशन केस ब्लू: नाझी जर्मनीने सोव्हिएत युनियन विरुद्ध आक्रमण सुरू केले.

१९२६: मर्सिडीज-बेंझ - गॉटलीब डेमलर आणि कार्ल बेंझ यांच्या दोन कंपन्यांचे विलीनीकरण करून या कपंनीची सुरवात केली.

१९१९: व्हर्सायचा तह - जर्मनी आणि मित्र राष्ट्रांमधील या तहामुळे पहिले महायुद्ध संपले.

१९१७: पहिले महायुद्ध - ग्रीस देश मित्र राष्ट्रांमध्ये सामील झाला.

१९१४: पहिले महायुद्ध - ऑस्ट्रियाचा आर्कड्यूक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी, डचेस ऑफ होहेनबर्ग यांची हत्या. पहिल्या महायुद्धाची सुरवात होण्यासाठी ही घटना कारणीभूत आहे.

१९११: नखला उल्कापात - पृथ्वीवर इजिप्त देशामध्ये पडली.

१९०४: एसएस नॉर्गे जहाज - उत्तर अटलांटिक महासागरात हे जहाज बुडाले, यात किमान ६३५ लोकांचे निधन.

१८४६: ऍडॉल्फ सॅक्स - यांनी सॅक्सोफोन वाद्याचे पेटंट घेतले.

आज यांचा जन्म

१९७०: मुश्ताकअहमद - पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक

१९५९: टी. पी. राजीवन - भारतीय कादंबरीकार (निधन: २ नोव्हेंबर २०२२)

१९३७: डॉ.गंगाधर पानतावणे - साहित्यिक समीक्षक, अस्मितादर्श या त्रैमासिकाचे संस्थापक संपादक

१९३४: रॉय गिलख्रिस्ट - वेस्टइंडीजचे क्रिकेटपटू (निधन: १८ जुलै २००१)

१९२८: बाबूराव सडवेलकर - चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक (निधन: २३ नोव्हेंबर २०००)

१९२६: रॉबर्ट लिडले - सीटी स्कॅनचे शोधक (निधन: २४ जुलै २०१२)

१९२१: पी. व्ही. नरसिम्हा राव - भारताचे ९वे पंतप्रधान (निधन: २३ डिसेंबर २००४)

१९०६: मारिया गोएपर्ट-मेयर - जर्मन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (निधन: २० फेब्रुवारी १९७२)

१७१२: रुसो - फ्रेंच विचारवंत, लेखक संगीतकार (निधन: २ जुलै १७७८)

१४९१: हेन्री (आठवा) - इंग्लंडचा राजा (निधन: २८ जानेवारी १५४७)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: टी. शिवदासा मेनन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (जन्म: १४ जून १९३२)

२०२२: पालोनजी मिस्त्री - भारतीय वंशाचे आयरिश उद्योगपती, शापूरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष - पद्म भूषण (जन्म: १ जून १९२९)

२०२२: वरिंदर सिंग - भारतीय फील्ड हॉकी खेळाडू - ऑलिम्पिक कांस्यपदक, ध्यानचंद खेलरत्न (जन्म: १६ मे १९४७)

२०२०: गीता नागाभूषण - भारतीय कन्नड स्त्रीवादी लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: २ मार्च १९४२)

२००९: ए. के. लोहितदास - भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक (जन्म: ६ मे १९५५)

२००७: यूजीन बी. फ्लकी - अमेरिकन अॅडमिरल - मेडल ऑफ ऑनर विजेते (जन्म: ५ ऑक्टोबर १९१३)

२००६: डॉ. निर्मलकुमार फडकुले - संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते

२०००: व्ही. एम. जोग - भारतीय उद्योजक (जन्म: ६ एप्रिल १९२७)

१९९९: रामभाऊ निसळ - स्वातंत्र्य सैनिकांचे नेते झुंजार पत्रकार

१९९०: प्रा. भालचंद खांडेकर - कवी

१९८७: पं. गजाननबुवा जोशी - शास्त्रीय गायक (जन्म: ३० जानेवारी १९११)

१९७२: प्रसंत चंद्र महालनोबिस - भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युटचे संस्थापक - पद्म विभूषण (जन्म: २९ जून १८९३)

१९१४: आर्कड्यूक फ्रांझ फर्डिनांड - ऑस्ट्रिया-हंगेरीच्या साम्राज्याचे वारस (जन्म: १८ डिसेंबर १८६३)

१९१४: सोफी, डचेस ऑफ होहेनबर्ग - ऑस्ट्रिया-हंगेरीच्या साम्राज्याचे वारस (जन्म: १ मार्च १८६८)

१८३६: जेम्स मॅडिसन - अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १६ मार्च १७५१)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com