दिनविशेष 28 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 28 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मार्च महिना सुरू झाला आहे, तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 28 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 28 मार्च रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९८: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्‌ड कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-१०००० हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला.

१९९२: उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

१९७९: अमेरिकेतील थ्री माईल आयलंड या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.

१९४२: रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेन्डन्स लीग ची स्थापना केली.

१९३०: तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली.

१९१०: हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.

१८५४: क्रिमियन युद्ध फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.

१७३७: बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.

आज यांचा जन्म

१९६८: नासिर हुसैन - इंग्लिश क्रिकेटपटू

१९२६: पॉली उम्रीगर - भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर (निधन: ७ नोव्हेंबर २००६)

१८६८: मॅक्झिम गॉर्की - रशियन लेखक (निधन: १८ जून १९३६)

आज यांची पुण्यतिथी

२०००: राम देशमुख -

१९९२: सम्राट आनंदऋषीजी - स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य (जन्म: २७ जुलै १९००)

१९६९: ड्वाईट आयसेनहॉवर - अमेरिकेचे ३४वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १४ ऑक्टोबर १८९०)

१९४२: रामप्रसाद चंदा - भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार (जन्म: १५ ऑगस्ट १८७३)

१९४१: कावसजी जमशेदजी पेटीगारा - भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर (जन्म: २४ नोव्हेंबर १८७७)

१९४१: व्हर्जिनिया वूल्फ - ब्रिटिश लेखिका (जन्म: २५ जानेवारी १८८२)

१९१६: स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई - राष्ट्रवादी लेखक, पत्रकार, संपादक आणि राजकीय कार्यकर्ते (जन्म: २५ मे १८७८)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com