दिनविशेष 29 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 29 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 29 January 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 29 जानेवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९८९: हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.

१९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.

१८८६: कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणाऱ्या;या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.

१८६१: कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.

१७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले.

आज यांचा जन्म

१९७०: राज्यवर्धनसिंग राठोड - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते भारतीय नेमबाज - पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न

१९५१: अँडी रॉबर्टस - वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू

१९४८: मामोरू मोहरी - जपानी अंतराळवीर, अमेरिकन स्पेसशिपमध्ये उड्डाण करणारे पहिले जपानी नागरिक

१९२६: अब्दूस सलाम - पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल विजेते एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल विजेते एकमेव मुस्लिम - नोबेल पुरस्कार (निधन: २१ नोव्हेंबर १९९६)

१९२४: एस. एन. गोयंका - भारतीय विपश्यना ध्यानाचे शिक्षक - पद्म भूषण (निधन: २९ सप्टेंबर २०१३)

१९२२: रज्जू भैय्या - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४थे सरसंघचालक (निधन: १४ जुलै २००३)

१८४३: विल्यम मॅकिन्ले - अमेरिकेचे २५वे राष्ट्राध्यक्ष (निधन: १४ सप्टेंबर १९०१)

आज यांची पुण्यतिथी

२०१९: जॉर्ज फर्नांडिस - भारतीय पत्रकार आणि राजकारणी - पद्मा विभूषण (जन्म: ३ जून १९३०)

२००१: राम मेघे - महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री

२०००: देवेन्द्र मुर्डेश्वर - बासरीवादक

२०००: काका वडके - राजकारणी

१९९५: रुपेश कुमार - खलनायक, निर्माते व दिग्दर्शक

१९६३: रॉबर्ट फ्रॉस्ट - अमेरिकन कवी (जन्म: २६ मार्च १८७४)

१९६३: सदाशिव आत्माराम जोगळेकर - लेखक व संपादक

१८२०: जॉर्ज (तिसरा) - इंग्लंडचा राजा (जन्म: ४ जून १७३८)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com