दिनविशेष 29 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 29 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

जून महिना सुरू झाला आहे, तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

Dinvishesh 29 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 29 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: उद्धव ठाकरे - महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री, यांनी मुख्यामंत्री पदाचा राजीनामा दिला.

२००७: आयफोन - अँपल कंपनीने पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.

२००१: कृष्ण दामोदर अभ्यंकर - यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.

१९८६: फुटबॉल विश्वकप - आर्जेन्टिना फुटबॉल संघाने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.

१९७६: सिशेल्स - देशाला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले.

१९७५: स्टीव्ह वोजनियाक यांनी अँपल -१ संगणकाचे पहिले प्रोटोटाइप तपासले.

१९७४: इसाबेल पेरेन - यांनी अर्जेंटिनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

१९७१: सोयुझ ११ अंतराळ दुर्घटना - क्रू कॅप्सूलमध्ये दबाव आल्यामुळे अपघातात जॉर्जी डोब्रोव्होल्स्की, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्हिक्टर पटसायेव अंतराळवीर यांचे निधन. अवकाशात निधन झालेले हे पहिले व्यक्ती आहेत.

१९५२: मिस युनिव्हर्स, १९५२ - पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली यात फिनलंडच्या आर्मी कुसेलाने किताब जिंकला.

१९५०: कोरियन युद्ध - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस ट्रुमन यांनी कोरियाची सागरी नाकेबंदी अधिकृत केली.

१८७१: ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला.

आज यांचा जन्म

१९५६: पेद्रोसंताना लोपेस - पोर्तुगालचे पंतप्रधान

१९४६: अर्नेस्टोपेरेझ बॅलादारेस - पनामाचे राष्ट्राध्यक्ष

१९४५: चंद्रिका कुमारतुंगा - श्रीलंकेच्या ५व्या राष्ट्राध्यक्षा

१९३४: कमलाकर सारंग - निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक (निधन: २५ सप्टेंबर १९९८)

१९०८: प्रतापसिंग गायकवाड - बडोद्याचे महाराज (निधन: १९ जुलै १९६८)

१८९३: प्रसंत चंद्र महालनोबिस - भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युटचे संस्थापक - पद्म विभूषण (निधन: २८ जून १९७२)

१८९१: डॉ. प. ल. वैद्य - प्राच्यविद्यासंशोधक (निधन: २५ फेब्रुवारी १९७८)

१८७१: श्रीपादकृष्ण कोल्हटकर - प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक (निधन: १ जून १९३४)

१८६४: आशुतोष मुखर्जी - शिक्षणतज्ज्ञ व वकिल

१८३२: संत रफ्का - लेबनॉनच्या पहिल्या महिला संत (निधन: २३ मार्च १९१४)

१६०९: पियरेपॉल रिकेट - फ्रेंच अभियंते, कॅनल डू मिडीचे रचनाकार (निधन: ४ ऑक्टोबर १६८०)

आज यांची पुण्यतिथी

२०१८: अरविद कार्लसन - स्वीडिश फार्माकोलॉजिस्ट आणि फिजिशियन - नोबेल पुरस्कार (जन्म: २५ जानेवारी १९२३)

२०११: के. डी. सेठना - भारतीय कवि, विद्वान आणि लेखक (जन्म: २६ नोव्हेंबर १९०४)

२०१०: प्रा. शिवाजीराव भोसले - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: १५ जुलै १९२७)

२००३: कॅथरिन हेपबर्न - हॉलिवूड अभिनेत्री (जन्म: १२ मे १९०७)

२०००: वासुदेव श्रीपाद बेलवलकर - ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन (जन्म: १८ फेब्रुवारी १९११)

१९९३: विष्णुपंत जोग - गायक आणि अभिनेते

१९९२: मोहंमद बुदियाफ - अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष

१९९२: शिवाजीराव भावे - सर्वोदयी कार्यकर्ते

१९८१: दिगंबर मोकाशी - मराठी कथा कादंबरीकार (जन्म: २७ नोव्हेंबर १९१५)

१९७१: जॉर्जी डोब्रोव्होल्स्की - सोव्हिएत अंतराळवीर, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्हिक्टर पटसायेव यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती (जन्म: १ जून १९२८)

१९७१: व्लादिस्लाव वोल्कोव्ह - सोव्हिएत अंतराळवीर, जॉर्जी डोब्रोव्होल्स्की आणि व्हिक्टर पटसायेव यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती (जन्म: २३ नोव्हेंबर १९३५)

१९७१: व्हिक्टर पटसायेव - सोव्हिएत अंतराळवीर, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्लादिस्लाव वोल्कोव्ह यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती (जन्म: १९ जून १९३३)

१९६६: दामोदर धर्मानंद कोसंबी - प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार (जन्म: ३१ जुलै १९०७)

१८९५: थॉमस हक्सले - ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक (जन्म: ४ मे १८२५)

१८७३: मायकेल मधुसूदन दत्त - भारतीय बंगाली कवी (जन्म: २५ जानेवारी १८२४)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com