दिनविशेष 29 जून 2023 : आषाढी एकादशी, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 28 जून या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं
आषाढी एकादशी
बकरी ईद
२०२२: उद्धव ठाकरे - महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री, यांनी मुख्यामंत्री पदाचा राजीनामा दिला.
२००७: आयफोन - अँपल कंपनीने पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.
२००१: कृष्ण दामोदर अभ्यंकर - यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.
१९८६: फुटबॉल विश्वकप - आर्जेन्टिना फुटबॉल संघाने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.
१९५२: मिस युनिव्हर्स, १९५२ - पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली यात फिनलंडच्या आर्मी कुसेलाने किताब जिंकला.
आज यांचा जन्म
१९३४: कमलाकर सारंग - निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक (निधन: २५ सप्टेंबर १९९८)
१९०८: प्रतापसिंग गायकवाड - बडोद्याचे महाराज (निधन: १९ जुलै १९६८)
१८९३: प्रसंत चंद्र महालनोबिस - भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युटचे संस्थापक - पद्म विभूषण (निधन: २८ जून १९७२)
१८९१: डॉ. प. ल. वैद्य - प्राच्यविद्यासंशोधक (निधन: २५ फेब्रुवारी १९७८)
१८७१: श्रीपादकृष्ण कोल्हटकर - प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक (निधन: १ जून १९३४)
१८६४: आशुतोष मुखर्जी - शिक्षणतज्ज्ञ व वकिल
१८३२: संत रफ्का - लेबनॉनच्या पहिल्या महिला संत (निधन: २३ मार्च १९१४)
आज यांची पुण्यतिथी
२०११: के. डी. सेठना - भारतीय कवि, विद्वान आणि लेखक (जन्म: २६ नोव्हेंबर १९०४)
२०१०: प्रा. शिवाजीराव भोसले - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: १५ जुलै १९२७)
२०००: वासुदेव श्रीपाद बेलवलकर - ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन (जन्म: १८ फेब्रुवारी १९११)
१९९३: विष्णुपंत जोग - गायक आणि अभिनेते
१९९२: शिवाजीराव भावे - सर्वोदयी कार्यकर्ते
१९८१: दिगंबर मोकाशी - मराठी कथा कादंबरीकार (जन्म: २७ नोव्हेंबर १९१५)
१९६६: दामोदर धर्मानंद कोसंबी - प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार (जन्म: ३१ जुलै १९०७)