दिनविशेष 29 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 29 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मार्च महिना सुरू झाला आहे, तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre

Dinvishesh 29 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 29 मार्च रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१४: इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.

१९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

१९७४: मरिनर प्रोग्राम - नासाचे मरिनर १० अंतराळयान बुध ग्रहापर्यंत पोहोचणारे पहिले अंतराळयान ठरले.

१९७३: व्हिएतनाम युद्ध व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.

१९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.

१९३०: प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.

१८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

आज यांचा जन्म

१९४८: नागनाथ कोतापल्ले - साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू

१९४३: जॉन मेजर - इंग्लंडचे पंतप्रधान

१९३९: सुरमा भोपाली - भारतीय विनोदी अभिनेते (निधन: ८ जुलै २०२०)

१९३०: अनिरुद्ध जगन्नाथ - मॉरिशसचे पंतप्रधान

१९२९: उत्पल दत्त - रंगभूमी आणि चित्रपट कलाकार (निधन: १९ ऑगस्ट १९९३)

१९२६: बाळ गाडगीळ - अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक (निधन: २१ मार्च २०१०)

१९१८: सॅम वॉल्टन - वॉलमार्टचे निर्माते (निधन: ५ एप्रिल १९९२)

१९१४: चापमॅन पिंचर - भारतीय-इंग्रजी इतिहासकार (निधन: ५ ऑगस्ट २०१४)

१८६९: सर एडविन लुटेन्स - दिल्लीचे नगररचनाकार (निधन: १ जानेवारी १९४४)

१७९०: जॉन टायलर - अमेरिका देशाचे १०वे राष्ट्राध्यक्ष (निधन: १८ जानेवारी १८६२)

आज यांची पुण्यतिथी

१९९७: पुपुल जयकर - सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (जन्म: ११ सप्टेंबर १९१५)

१९८२: वॉल्टर हॉलस्टेन - युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष (जन्म: १७ नोव्हेंबर १९०१)

१९७१: धीरेंद्रनाथ दत्ता - बांगलादेशी राजकारणी (जन्म: २ नोव्हेंबर १८८६)

१९६४: वत्स जोशी - इतिहाससंशोधक

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com