दिनविशेष 03 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 03 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Sakshi Patil

Dinvishesh 03 May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 3 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९९: एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय गृहस्थाने १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदांत पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला.
१९९४: सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखालील अफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण अफ्रिकेत वांशिक तत्त्वावर निवडणूका होत असत.
१९७३: शिकागो येथील १४५१ फूट उंच आणि १०८ माजले असलेली सिअर्स टॉवर ही (त्या काळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली.
१९४७: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.
१९३९: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
१९१३: दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.
१८०२: वॉशिंग्टन (डीसी) या शहराची स्थापना झाली.
१७१५: संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशिया मध्ये दिसले.

आज यांचा जन्म

१९५९: उमा भारती - भाजपाच्या जेष्ठ नेत्या
१९५१: अशोक गेहलोत - राजस्थानचे १४वे मुख्यमंत्री
१९२४: केन टायरेल - टायरेल रेसिंगचे संस्थापक (निधन: २५ ऑगस्ट २००१)
१८९८: गोल्डा मायर - इस्रायलच्या ४थ्या व पहिल्या महिला पंतप्रधान (निधन: ८ डिसेंबर १९७८)
१८९७: भालजी पेंढारकर - मराठी चित्रपटसृष्टीचे महर्षी (निधन: २६ नोव्हेंबर १९९४)
१८९६: व्ही. के. कृष्ण मेनन - भारतीय राजकारणी, संरक्षणमंत्री - पद्म विभूषण (निधन: ६ ऑक्टोबर १९७४)
१२१७: राजा हेन्री (पहिला) - सायप्रसचे राजा (निधन: १८ जानेवारी १२५३)

आज यांची पुण्यतिथी

२००९: राम बाळकृष्ण शेवाळकर - जेष्ठ साहित्यिक (जन्म: २ मार्च १९३१)
२००६: प्रमोद महाजन - केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार (जन्म: ३० ऑक्टोबर १९४९)
२०००: शकुंतला परांजपे - भारतीय समाजसेविका (जन्म: १७ जानेवारी १९०६)
१९९६: वसंत गवाणकर - व्यंगचित्रकार
१९८१: नर्गिस दत्त - हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: १ जून १९२९)
१९७८: विठ्ठल दत्तात्रय घाटे - मराठी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ (जन्म: १८ जानेवारी १८९५)
१९७७: हमीद दलवाई - मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे स्वातंत्रसैनिक (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)
१९७१: डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ - अर्थशास्त्रज्ञ (जन्म: १० एप्रिल १९०१)
१९६९: डॉ. झाकिर हुसेन - भारताचे ३रे राष्ट्रपती - भारतरत्न, पद्म विभूषण (जन्म: ८ फेब्रुवारी १८९७)
१९२५: क्लेमेंट एडर - फ्रेंच अभियंते, एडर एव्हियन III चे रचनाकार (जन्म: २ एप्रिल १८४१)
१९१२: नझीर अहमद देहलवी - उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com