दिनविशेष 30 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 30 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

Dinvishesh 30 May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 30 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९८: अफगाणिस्तान - देशात झालेल्या ६.५ मेगावॅट क्षमतेच्या भूकंपात ४००० पेक्षा जास्त लोकांचे निधन.

१९९३: पु. ल. देशपांडे - यांना त्रिदल संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.

१९८७: गोवा - राज्याचा दर्जा देण्यात आला.

१९७५: युरोपियन स्पेस एजंसी (ESA) - स्थापना.

१९७४: एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली.

१९४२: दुसरे महायुद्ध - इंग्लंडच्या १००० विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला.

१९३४: मुंबई नभोवाणी केंद्र - सुरुवात.

१६३१: गॅझेट डी फ्रान्स - पहिले फ्रेंच वृत्तपत्र प्रकाशित.

१५७४: हेन्री (तिसरा) - फ्रान्सचा राजा बनला.

आज यांचा जन्म

१९५०: परेश रावल - भारतीय अभिनेते - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

१९४९: बॉब विलीस - इंग्लिश क्रिकेटपटू

१९४०: जगमोहन दालमिया - भारतीय उद्योजक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) २६वे अध्यक्ष (निधन: २० सप्टेंबर २०१५)

१९०८: हॅनेस अल्फेन - स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते - नोबेल पुरस्कार (निधन: २ एप्रिल १९९५)

१८९४: डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर - इतिहासकार (निधन: १० जुलै १९६९)

आज यांची पुण्यतिथी

२००७: गुंटूर सेशंदर शर्मा - भारतीय कवी आणि समीक्षक (जन्म: २० ऑक्टोबर १९२७)

२०००: राम विलास शर्मा - भारतीय कवी आणि समीक्षक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १० ऑक्टोबर १९१२)

१९८९: दर्शनसिंहजी महाराज - शीख संतकवी (जन्म: १४ सप्टेंबर १९२१)

१९८६: पेरी एलिस - अमेरिकन फॅशन डिझायनर, पेरी एलिस कंपनीचे संस्थापक (जन्म: ३ मार्च १९४०)

१९८१: झिया उर रहमान - बांगलादेशचे ७वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १९ जानेवारी १९३६)

१९६८: सावळाराम लक्ष्मण हळदणकर - मराठी चित्रकार (जन्म: २५ नोव्हेंबर १८८२)

१९५५: नारायण मल्हार जोशी - भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक (जन्म: ५ जून १८७९)

१९५०: दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर - प्राच्यविद्या संशोधक

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com