9 July 2023 Dinvishesh : 9 जुलै दिनविशेष, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 9 July 2023 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 9 जुलै या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं
२०११: दक्षिण सुदान - सुदान राष्ट्रातून या नवीन देशाची निर्मिती.
१९६९: वाघ - भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.
१९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
१८९३: डॉ. डॅनियल हेल - यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.
१८७७: विंबल्डन - पहिली विंबल्डन स्पर्धा सुरु झाली.
१८७४: इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.
१८७३: मुंबई शेअर बाजार - एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
आज यांचा जन्म
१९७१: मार्क अँडरसन - नेटस्केपचे सहसंस्थापक
१९५०: व्हिक्टर यानुकोविच - युक्रेनचे ४थे पंतप्रधान
१९४४: जूडिथ एम. ब्राउन - भारतीय-इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक
१९३८: संजीवकुमार - प्रसिद्ध अभिनेते (निधन: ६ नोव्हेंबर १९८५)
१९३०: के. बालाचंदर - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक (निधन: २३ डिसेंबर २०१४)
१९२६: बेन मॉटलसन - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पूरस्कार
१९२५: सुखबीर - भारतीय लेखक आणि कवी (निधन: २२ फेब्रुवारी २०१२)
१९२५: गुरू दत्त - प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (निधन: १० ऑक्टोबर १९६४)
१९२३: लच्छमानसिंग लेहल - मेजर-जनरल - वीर चक्र, परम विशिष्ठ सेवा (निधन: १८ जून २०२०)
१९०८: अल्लामाह रशीद तुराबी - भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ (निधन: १८ डिसेंबर १९७३)
१८१९: एलियास होवे - शिवणयंत्राचे संशोधक (निधन: ३ ऑक्टोबर १८६७)
१७२१: योहान निकोलॉस गोत्झ - जर्मन लेखक
१६८९: ऍलेक्सिस पिरॉन - फ्रेंच लेखक
९ जुलै निधन
२०२२: बी.के. सिंगल - भारतातील इंटरनेट आणि डेटा सेवांचे जनक
२०२०: रांजॉन घोषाल - भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि संगीतकार (जन्म: ७ जून १९५५)
२००५: रफिक झकारिया - भारतीय राजकारणी (जन्म: ५ एप्रिल १९२०)
२००५: करीम इमामी - भारतीय-ईराणी लेखक आणि समीक्षक (जन्म: २६ मे १९३०)
१९८४: कवी बाकीबाब - भारतीय गोमंतकीय कवी - पद्मश्री (जन्म: ३० नोव्हेंबर १९१०)
१९६८: सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर - सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक (जन्म: २० एप्रिल १८९६)
१९३२: किंग कँप जिलेट - अमेरिकन संशोधक व उद्योजक (जन्म: ५ जानेवारी १८५५)
१८५६: ऍॅव्होगॅड्रो - इटालियन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ ऑगस्ट १७७६)