Akshay Tritiya 2024 Wishes in Marathi: अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा

Akshay Tritiya 2024 Wishes in Marathi: अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा

हिंदू धर्मीयांसाठी शुभ कार्यांना कोणतीही वेळ न पाहता कामाचा श्रीगणेशा करण्यासाठी वर्षभरात 4 दिवस हे साडेतीन मुहूर्त म्हणून दिले गेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

हिंदू धर्मीयांसाठी शुभ कार्यांना कोणतीही वेळ न पाहता कामाचा श्रीगणेशा करण्यासाठी वर्षभरात 4 दिवस हे साडेतीन मुहूर्त म्हणून दिले गेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस अक्षय्य तृतीया म्हणून साजरा केला जातो. यंदा अक्षय्य तृतीया 10 मे या दिवशी साजरी केली जाणार आहे. हिंदू बांधवांसोबतच जैन धर्मीय देखील या दिवशी विशेष व्रत ठेवतात. जैन धर्मीय या दिवसाला आखा तीज म्हणतात. मग अशा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, प्रियजनांना, आप्तांना, मित्रमंडळींना WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Greetings द्वारा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.

ज्या आनंदाची अपेक्षा आहे

ती या अक्षय तृतीयेला पूर्ण होवो

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी,

तुमच्या आयुष्यात अक्षय राहो सुख शांती,

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

होईल दर्शन मंगल स्वरूपाचे

करू व्रत या शुभ दिवसाचे

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

लक्ष्मीचा वास होवो

संकटांचा नाश होवो

शांतीचा वास राहो

धनाची बरसात होवो

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो..

तुमच्याकडे अक्षय धनाचा साठा होवो..

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com