Akshaya Tritiya 2023 : आज अक्षय्य तृतीया;  जाणून घ्या महत्व
Admin

Akshaya Tritiya 2023 : आज अक्षय्य तृतीया; जाणून घ्या महत्व

आज अक्षय्य तृतीया. हिंदू पंचांगात साडेतीन मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज अक्षय्य तृतीया. हिंदू पंचांगात साडेतीन मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि समृध्दी घेऊन येतो. यादिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते तसेच सोने- चांदीच्या वस्तूंची खरेदी देखील केली जाते. असे म्हटले जाते.

वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच, तिसऱ्या दिवसी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. या दिवशी अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी नारायण आणि कलशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. यंदाचा पूजेचा शुभ मुहूर्त 22 एप्रिल रोजी सकाळी 07.49 पासून दुपारी 12.20 पर्यंत असणार आहे.

या दिवशी लग्न समारंभ, मुंज समारंभ इत्यादीसाठी हा शुभ दिवस मानला जातो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी, घरात प्रवेश करण्यासाठी, दागिने, कपडे, वाहने खरेदी करतात.

वरील सर्व बाबी लोकशाही मराठी न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com