आज अंगारकी चतुर्थी; जाणून घ्या अंगारकीचे विशेष महत्त्व

आज अंगारकी चतुर्थी; जाणून घ्या अंगारकीचे विशेष महत्त्व

आज अंगारकी चतुर्थी आहे. १० जानेवारी रोजी २०२३ या वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे.

आज अंगारकी चतुर्थी आहे. १० जानेवारी रोजी २०२३ या वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले, तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते.धार्मिक श्रद्धेनुसार अंगारकी संकष्टी चतुर्थीला श्रीगणेशची पूजा केल्याने सर्व दु:ख दूर होतात आणि श्री गणेशाची कृपा प्राप्त होते. संकष्टी चतुर्थीला चंद्र दर्शन करणे शुभ मानले जाते. या दिवशी चंद्राला अर्ध्य द्यावे आणि त्यानंतर चतुर्थीचं व्रत पूर्ण करावे.

धार्मिक मान्यतांनुसार या दिवसाला खूप महत्व आहे. या दिवशी भगवान श्री गणेशाची विधिवत पूजा करून उपवास केल्यास जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि आयुष्यात सुखी-शांती प्राप्त होते. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने आयुष्यातील सर्व विघ्ने बाप्पा दूर करतात अशी मान्यता आहे.गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! ह्या एकमेव दैवतासाठी समस्त मंडळी भाविक होतात आणि भावुकही होतात. `बाप्पा साठी काही पण' असा गणेशभक्तांचा पवित्रा असतो. काही जण मंगळवारचा किंवा संकष्टीचा उपास करतात, तर काही जण नियमितपणे गणपती मंदिरात जातात.

हिंदू पुराणात गणेशाच्या संबंधित अध्यायानुसार, गणपतीचा अंगारकी नामक एक भक्त होता. ऋषी भारद्वाज आणि माता पृथ्वीचा पुत्र अंगारकीने एके दिवशी गणेशाची आराधना सुरु केली. या तपस्येने प्रसन्न होऊन श्रीगणेश त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि सोबतच एक वर मागण्यास सांगितले. यावेळी अंगारकीने त्यांच्याकडे अशी मागणी केली की, मला तुमच्या नावाशी जोडले जायचे आहे. या मागणीनंतर श्रीगणेशाने अंगारकीला वरदान दिले, ज्यानुसार पुढील काळात जेव्हा जेव्हा चतुर्थी आणि मंगळवार हा योग्य जुळून येईल तेव्हा त्यास अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com