Buck Moon 2023
Buck Moon 2023Team Lokshahi

Buck Moon 2023 : काय आहे बक मून? जुलैमध्ये दिसणार अप्रतिम दृश्य

आजचा चंद्र हा त्याच्या सामान्य आकारापेक्षा अधिक मोठा आणि जास्त चमकदार दिसणार आहे.
Published by  :
shweta walge

अवकाशात अनेक खगोलीय घटना घडतात. काही घटना इतक्या सुंदर असताता की लोकांचे लक्ष वेधून घेतात. अशीच सुंदर घटना आज घडणार आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2023 मध्ये लोकांना पृथ्वीवर चार वेळा सुपरमून पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वर्षातील पहिला सुपरमून आज म्हणजेच 3 जुलै 2023 रोजी दिसणार आहे.

आजचा चंद्र हा त्याच्या सामान्य आकारापेक्षा अधिक मोठा आणि जास्त चमकदार दिसणार आहे. आज आकाशाच दिसणाऱ्या चंद्राला बक मून (Buck Moon) किंवा सुपरमून (Super Moon) असे म्हणतात. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:०८ वाजता दिल्लीत सुपरमून पाहता येणार आहे.

काय आहे बक मून

बक मून किंवा सुपर मून जुलै महिन्यात दिसतो. पंचांगानुसार दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी तो त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा आकाशात दिसतो. 3 जुलै 2023 रोजी म्हणजेच आज बक मूनचे सुंदर आणि आश्चर्यकारक दृश्य संपूर्ण जगभरात दिसेल.

बक मून किंवा सुपनमून का म्हणले जाते?

जून-जुलै महिन्यात नर हरणांची शिंगे खूप वेगाने वाढतात आणि या काळात त्यांचा आकार सर्वात मोठा असतो. नासाच्या मते, "बक मून" हे नाव द मेन फार्मर्स पंचांगावरून देण्यात आले आहे. त्याच वेळी याला "थंडर मून" असेही म्हणतात, कारण या महिन्यात गडगडाटासह पाऊस पडतो. भारतात याला "आषाढ पौर्णिमा" किंवा "गुरु पौर्णिमा" (गुरु पौर्णिमा 2023) म्हणतात. आणि महर्षी वेद व्यास जयंती (महर्षी वेद व्यास जयंती 2023) देखील या दिवशी साजरी केली जाते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com