पशुधन वाचविण्यासाठी गोरक्षकांनी पुढाकार घ्यावा : होमिओपॅथिक तज्ञ डॉ.संदिप चव्हाण यांचे आवाहन
Team Lokshahi

पशुधन वाचविण्यासाठी गोरक्षकांनी पुढाकार घ्यावा : होमिओपॅथिक तज्ञ डॉ.संदिप चव्हाण यांचे आवाहन

ग्रामीण विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पशुधनावर सध्या लम्पि रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, शासकीय पातळीवर उपचारा संधर्भात प्रयत्न जरी होत असले तरी ते पूरेसे नाहीत
Published by :
shweta walge

अमोल नांदूरकर,अकोला : ग्रामीण विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पशुधनावर सध्या लम्पि रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, शासकीय पातळीवर उपचारा संधर्भात प्रयत्न जरी होत असले तरी ते पूरेसे नाहीत, गौमाता असलेल्या गाईवर या रोगाचे आक्रमण तिव्र आहे, अश्या परिस्थितीत गौपालकांनी, गौरक्षकांनी तसेच गौरक्षण संस्थांनी गाईचे प्राण वाचविन्यासाठी रोगमुक्त करण्यासाठी अग्रक्रमाने पुढाकार घ्यावा पशुधन वाचविण्याची तसेच त्यांना नवजीवन देण्याची संधी गोरक्षकांना चालून आली आहे, लंपीग्रस्त जनावरांचा शोध घेवून त्यांच्या पर्यंत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक व औषधोपचार पोहचवण्यासाठी सामाजिक जाणीवेने प्रयत्न करावेत, असे आवाहन नेहमी आपली सामाजिक बांधिलकी जपण्या करिता परिचित असलेले सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉ.संदिप चव्हाण यांनी समाज हिताच्या दृष्टीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून केलेले आहे.

आईच्या दुधानंतर गाईचे दूध आज सुरक्षित आहे का ?

आईच्या दुधानंतर गाईचे दूध आज सुरक्षित आहे का तर अद्यावत जरी याचे उत्तर हो असले तरी गाईची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. कारण मनुष्याला आजारी पडल्यानंतर होणारा त्रास सांगता येतो परंतु जनावरांना सांगता येत नाही त्यामुळे आपल्यालाच त्यांना होणाऱ्या प्रादुर्भावाचा बंदोबस्त करायचा आहे.

प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखे महत्वचे मुद्दे

1) आईच्या दुधानंतर गाईचे दूध, त्यामुळे मनुष्याला उध्दभवणारा धोका नाकारता येत नाही ?

2) लहान मुलांचे जेवना व्यतिरिक्त मुख्य आहार दूध, त्यामुळे त्यांना होणारा संभाव्य धोका नाकारता येत नाही ?

3) उपचार हा फक्त लक्षणांपुरताच मर्यादित न ठेवता, गाईची एकंदरीत प्रतिकार शक्ती कशी वाढवता येईल यावर आधारित असावी.

4) प्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता ही कोरोना काळात होमिओपॅथिक औषधांनी दाखवून दिलेली आहे , त्यामुळे त्याचा प्रामुख्याने विचार व्हावा ...

कोरोना काळात होमिओपॅथीने अनेकांचे प्राण वाचविले, लंपीग्रस्त जनावरांवर देखील होमिओपॅथीची औषधे त्यांना रोगमुक्त करण्यासोबतच नवजीवन देणारी ठरतील असा मला ठाम विश्वास वाटतो,या संदर्भात तज्ञ मंडळी चाचपणी करीत आहेत, त्यातून निघणा-या निष्कर्षावर तसेच सहमतीवर पुढील दीशा ठरु शकेल असा आशावाद होमिओपॅथिक तज्ञ डॉ.संदिप चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

पशुधन वाचविण्यासाठी गोरक्षकांनी पुढाकार घ्यावा : होमिओपॅथिक तज्ञ डॉ.संदिप चव्हाण यांचे आवाहन
मुकेश अंबानींनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, दिली एवढ्या कोटींची देणगी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com