दिनविशेष 04 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 04 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
shweta walge

Dinvishesh 04 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 04 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००४: फेसबुक - सुरवात

२००३: युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.

१९६१: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान.

१९४८: श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.

१९४४: चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच.

१९३६: कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.

१९२२: चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.

१७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.

१६७०: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.

आज यांचा जन्म

१९७४: उर्मिला मातोंडकर - चित्रपट अभिनेत्री

१९३८: पंडित बिरजू महाराज - भारतीय कथ्थक नर्तक व गुरू - पद्म विभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: १७ जानेवारी २०२२)

१९२२: पंडित भीमसेन जोशी - भारतीय शास्त्रीय गायक स्वरभास्कर - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २४ जानेवारी २०११)

१९१७: जनरल ह्याह्या खान - पाकिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष (निधन: १० ऑगस्ट १९८०)

१९०६: क्लाईड टॉम्बॉग - प्लूटो ग्रहाचे संशोधक, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (निधन: १७ जानेवारी १९९७)

१९०२: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग - अमेरिकन वैमानिक (निधन: २६ ऑगस्ट १९७४)

१९०२: ऑगस्टस लिंडबर्ग - धाडसी अमेरिकन वैमानिक चार्ल्स (निधन: २६ ऑगस्ट १९७४)

१८९३: चिंतामण गणेश कर्वे - मराठी कोशकार आणि लेखक (निधन: १६ डिसेंबर १९६०)

१८९१: एम. ए. अय्यंगार - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: १९ मार्च १९७८)

आज यांची पुण्यतिथी

२०२३: वाणी जयराम - भारतीय पार्श्वगायिका - पद्मा भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: ३० नोव्हेंबर १९४५)

२०११: मार्टिअल सेलेस्टीन - हैती देशाचे पहिले पंतप्रधान (जन्म: ४ ऑक्टोबर १९१३)

२००२: मास्टर भगवान - चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (जन्म: १ ऑगस्ट १९१३)

२००१: पंकज रॉय - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: ३१ मे १९२८)

१९८४: जानकी अम्माल - भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ (जन्म: ४ नोव्हेंबर १८९७)

१९७४: सत्येंद्रनाथ बोस - भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ - पद्म विभूषण (जन्म: १ जानेवारी १८९४)

१८९४: अडॉल्फ सॅक्स - सॅक्सोफोन वाद्याचे जनक (जन्म: ६ नोव्हेंबर १८१४)

१६७०: तानाजी मालुसरे - नरवीर

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com