दिनविशेष 06 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 06 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
shweta walge
Published on

Dinvishesh 06 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 06 मार्च या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.

२०००: शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक् कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक् कामोर्तब केला.

१९९९: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.

१९९८: गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.

१९९७: स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.

१९९२: मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.

१९७५: इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.

१९७१: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.

१९६४: कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली ये नाव धारण केले.

१९५७: घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.

१९५३: जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१९४०: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.

१८४०: बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.

आज यांचा जन्म

१९६५: देवकी पंडित - भारीतय शास्त्रीय गायिका

१९५७: अशोक पटेल - भारतीय क्रिकेटपटू

१९४९: शौकत अजिझ - पाकिस्तानी राजकारणी

१९४६: रिचर्ड नोबल - १,०१९.४६८ किमी/तास वेगाचा लँड स्पीड रेकॉर्ड करणारे

१९४५: सय्यद अहमद - भारतीय लेखक आणि राजकारणी (निधन: २७ सप्टेंबर २०१५)

१९३९: ऍडम ओस्बोर्न - ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशनचे संस्थापक (निधन: १८ मार्च २००३)

१९३७: व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा - पहिल्या महिला अंतराळवीर

१९१५: सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन - बोहरी धर्मगुरू

१९१५: सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन - ५२वे दाई अल-मुतलक, भारतीय आध्यात्मिक नेते (निधन: १७ जानेवारी २०१४)

१८९९: शि. ल. करंदीकर - चरित्रकार आणि संपादक

आज यांची पुण्यतिथी

२०००: नारायण काशिनाथ लेले - कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती

१९९९: सतीश वागळे - हिंदी आणि मराठी चित्रपट निर्माते

१९९२: रणजित देसाई - नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ८ एप्रिल १९२८)

१९८२: रामभाऊ म्हाळगी - आदर्श लोकप्रतिनिधी खासदार

१९८२: ऍना रँड - रशियन-अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या (जन्म: २ फेब्रुवारी १९०५)

१९७३: पर्ल एस. बक - अमेरिकन लेखिका - नोबेल पुरस्कार (जन्म: २६ जून १८९२)

१९६८: ना. गो. चापेकर - साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ

१९६७: जॉन हेडन बॅडले - इंग्रजी लेखक, शिक्षक, बेडलेस स्कूलचे संस्थापक (जन्म: २१ फेब्रुवारी १८६५)

१९४७: सर हॅल्फोर्ड जॉन मॅकेंडर - इंग्रजी भूगोलशास्त्रज्ञ, बॅटियन शिखर पहिल्यांदा चढाई करणारे (जन्म: १५ फेब्रुवारी १८६१)

१९४७: मकिंडर हॉलफोर्ड जॉन - ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी

१९४१: गस्टन बोरग्लम - माऊंट रशमोअरचे शिल्पकार (जन्म: २५ मार्च १८६७)

१९००: गॉटलीब डेमलर - इंटर्नल- कंबशन इंजिन आणि ऑटोमोबाईल विकासाचे प्रणेते, डेमलर मोटर्स कॉर्पोरेशचे सहसंस्थापक (जन्म: १७ मार्च १८३४)

दिनविशेष 06 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
Mahashivratri 2023 : महाशिवरात्री हा सण का साजरा केला जातो?
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com