दिनविशेष 10 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 10 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
shweta walge

Dinvishesh 10 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 10 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: चार्ल्स (तिसरा) - चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज यांना युनायटेड किंगडमचा राजा चार्ल्स (तिसरा) म्हणून घोषित करण्यात आले आहे

२००२: परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.

२००१: मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.

१९९६: गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर यांना, तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वेयांना जाहीर झाला.

१९७५: व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.

१९६७: जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

१९६६: पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.

१९४३: दुसरे महायुद्ध जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

१९३९: दुसरे महायुद्ध कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१८९८: लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.

१८४६: एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले.

आज यांचा जन्म

१९८९: मनीष पांडे - भारतीय क्रिकेटपटू

१९४८: भक्ती बर्वे - अभिनेत्री (निधन: १२ फेब्रुवारी २००१)

१९४०: जिम हाइन्स - १००-मीटर स्प्रिंट पाळण्याच्या शर्यतीमध्ये ९.९५ सेकंद वेळेसह तथाकथित 'दहा-सेकंदचा अडथळा' पार करणारे पहिले धावपटू

१९३२: शेखर जोशी - भारतीय लेखक (निधन: ४ ऑक्टोबर २०२२)

१९१२: बी. डी. जत्ती - भारताचे ५वे उपराष्ट्रपती, हंगामी राष्ट्रपती (निधन: ७ जून २००२)

१८९५: विश्वनाथ सत्यनारायण - भारतीय कवी आणि लेखक (निधन: १८ ऑक्टोबर १९७६)

१८९२: आर्थर कॉम्प्टन - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार

१८८७: गोविंद वल्लभ पंत - उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री (निधन: ७ मार्च १९६१)

१८७२: महाराजा के. एस. रणजितसिंह - कसोटी क्रिकेट खेळाडू (निधन: २ एप्रिल १९३३)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: बी. बी. लाल - भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे महासंचालक - पद्म भूषण (जन्म: २ मे १९९१)

२००६: टॉफाहाऊ टुपोऊ - टोंगाचा राजा

२०००: झैब-अन-नसीसा हमिदुल्ला - भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक (जन्म: २५ डिसेंबर १९२१)

१९८३: फेलिक्स ब्लॉक - नोबेल पारितोषिक विजेते स्वीस भौतिकशास्त्रज्ञ

१९७९: अँगोलांनो नेटो - अँगोला देशाचे पहिले राष्ट्रपती (जन्म: १७ सप्टेंबर १९२२)

१९७५: जॉर्ज पेजेट थॉमसन - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार

१९६४: श्रीधर पार्सेकर - व्हायोलिन वादक

१९४८: फर्डिनांड - बल्गेरियाचा राजा

१९२३: सुकुमार रॉय - बंगाली साहित्यिक (जन्म: ३० ऑक्टोबर १८८७)

१९००: डॉ. विश्राम रामजी घोले - महात्मा फुलेसहकारी व नामवंत शल्यचिकित्सक

इ.स.पू. २१०: किन शी हुआंग - चीनचे पहिले सम्राट (जन्म: १८ फेब्रुवारी २५९)

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com