दिनविशेष 11 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 11 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 11 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 11 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

राष्ट्रीय शिक्षण दिन

२००४: यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती.

१९८१: अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९७५: अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.

१९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले.

१९४२: दुसरे महायुद्ध नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.

१९३०: आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.

१९२६: अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.

आज यांचा जन्म

१९८५: रॉबिन उथप्पा - भारतीय क्रिकेटपटू

१९६२: डेमी मूर - अमेरिकन अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल

१९३६: सिंधुताई सपकाळ - मतिमंद मुलांच्या कामायनी संस्थेच्या संस्थापिका, भारतीय समाजसुधारक - पद्मश्री (निधन: ४ जानेवारी २०२२)

१९३६: माला सिन्हा - हिंदी,नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री

१९२६: जॉनी वॉकर - हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते (निधन: २९ जुलै २००३)

१९२४: रुसी शेरियर मोदी - कसोटीपटू (निधन: १७ मे १९९६)

१९११: गोपाल नरहर नातूपुणे - लोककवी (निधन: ७ मे १९९१)

१९११: मनमोहन नातू - लोककवी गोपाळ नरहर तथा (निधन: ७ मे १९९१)

१९०४: जे. एच. सी. व्हाइटहेड - भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक (निधन: ८ मे १९६०)

१८८८: आचार्य कॄपलानी - स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी आणि पर्यावरणवादी (निधन: १९ मार्च १९८२)

१८८६: पठ्ठे बापूराव - लावणी लेखक (निधन: २२ डिसेंबर १९४५)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: सिद्धान्त वीर सुर्यवंशी - भारतीय अभिनेते (जन्म: १५ डिसेंबर १९७५)

२००५: डॉ. एम. सी. मोदी - नेत्रतज्ज्ञ

१९९९: अरविंद मेस्त्री - शिल्पकार

१९९७: यशवंत दत्त - चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ

१९९४: कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा - कन्नड लेखक व कवी (जन्म: २९ डिसेंबर १९०४)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com