दिनविशेष 12 ऑगस्ट 2023 : आंतरराष्ट्रीय युवा दिन; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 12 ऑगस्ट 2023 : आंतरराष्ट्रीय युवा दिन; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 12 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 12 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

आंतरराष्ट्रीय युवा दिन

आंतरराष्ट्रीय हत्ती दिन

२००२: सर्गेई कार्जाकिन - हे १२ वर्षे ७ महिने वयाचे जगातील सर्वात लहान वयात बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनले.

१९९५: मायकेल जॉन्सन - अमेरिकन खेळाडू यांनी जागतिक मैदानी स्पर्धेत २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारे ते पहिले पुरुष धावपटू ठरले.

१९८९: जागतिक मराठी परिषद - कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली परिषद सुरू झाली.

१९८१: आई.बी.एम. - कंपनीचे पहिले पर्सनल कॉम्प्युटर प्रकशित करण्यात आले.

१९६०: इको - १ए - नासाच्या पहिल्या संचार उपग्रहचे यशस्वी प्रक्षेपण झाले.

१९२०: स्वराज्य - शिवराम महादेव परांजपे हे साप्ताहिक सुरू केले.

१८५१: आयझॅक सिंगर - यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.

१७६५: अलाहाबादचा तह - ह्या करारामुळे भारतातील कंपनी राजवटीची सुरुवात झाली.

१४९२: ख्रिस्तोफर कोलंबस - नवीन जगाच्या शोधात निघालेल्या पहिल्या प्रवासात कॅनरी बेटांवर पोहोचले.

आज यांचा जन्म

१९७२: ज्ञानेंद्र पांडे - भारतीय क्रिकेट खेळाडू

१९६०: इस्माइल श्रॉफ - भारतीय चित्रपट दिग्दर्शक (निधन: २६ ऑक्टोबर २०२२)

१९५९: प्रवीण ठिपसे - बुद्धीबळपटू

१९५२: सीताराम येचुरी - भारतीय राजकारणी

१९४८: फकिरा मुंजाजी शिंदे - कवी, समीक्षक व अनुवादक

१९४३: जावेद आलम - भारतीय शिक्षणतज्ज्ञ (निधन: ५ डिसेंबर २०१६)

१९२६: अप्पासाहेब खेडकर - गणेशमुर्तीकार आणि शिल्पकार

१९१९: विक्रम साराभाई - भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - पद्म विभूषण, पद्म भूषण (निधन: ३१ डिसेंबर १९७१)

१८९२: एस. आर. रंगनाथन - भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ - पद्मश्री (निधन: २७ सप्टेंबर १९७२)

१८९०: त्र्यंबक बापूजी ठोमरे - बालकवी, निसर्गकवी (निधन: ५ मे १९१८)

१८८०: बाळकृष्ण गणेश खापर्डे - चरित्रकार,वाड्मयविवेचक

आज यांची पुण्यतिथी

२०२२: अंशू जैन - भारतीय-ब्रिटिश बँकर, ड्यूश बँकेचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (जन्म: ७ जानेवारी १९६३)

१९८४: आनंदीबाई जयवंत - कवी, समीक्षक व अनुवादक

१९७३: भाऊसाहेब बांदोडकर - गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक (जन्म: १२ मार्च १९११)

१९६८: बाळशास्त्री व्यंकटेश हरदास - नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com