आज काय घडले : दोन्ही राष्ट्रांचे एकत्रीकरण होऊन एकसंध जर्मनी

आज काय घडले : दोन्ही राष्ट्रांचे एकत्रीकरण होऊन एकसंध जर्मनी

आज काय घडले : दोन्ही राष्ट्रांचे एकत्रीकरण होऊन एकसंध जर्मनी
Published by :
Team Lokshahi

सुविचार

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

आज जागतिक डावखुरा दिवस : डाव्या हाताने काम करण्याचा फायदा आणि तोटा यातील महत्व लोकांना समजावून सांगण्यासाठी दरवर्षी १३ ऑगस्ट हा दिवस जागतिक डावखुरा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. १९७६ मध्ये आंतरराष्ट्रीय डावखरे संघटनेची स्थापना डेन कॅम्बेल यांनी केली.

  • १९५४ मध्ये रेडिओ पाकिस्तान वरुन कौमी तराना हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.

  • १९६१मध्ये आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली. ही भिंत बांधल्यानंतर हे पलायन जवळजवळ संपुर्णपणे संपुष्टात आले. त्यानंतर १९९० मध्ये दोन्ही राष्ट्रांचे एकत्रीकरण होऊन एकसंध जर्मनी झाला.

  • २००४ मध्ये ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उद्घाटन सोहळा पाहिला.

आज यांचा जन्म

  • स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणीचे संशोधक जॉन लोगे बेअर्ड यांचा १८८८ मध्ये जन्म झाला. या अवलिया शास्त्रज्ञाने प्रचंड कष्टाने व लोकांकडून अवहेलना सहन करूनही टीव्हीचा शोध लावला. टीव्हीच्या शोधाच्या वेळेस ते भुतटकी करतात, असा आरोप त्यांच्यावर झाला.

  • ‘श्रावण मासि हर्ष मानसी' या सारख्या एकापेक्षा एक सरस कवितेची देण मराठी माणसाला देणाऱ्या निसर्ग कवी बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म १८९० रोजी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे झाला.

  • मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते प्र.के.अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म १८९८ मध्ये झाला. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.

  • महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक व मराठी चित्रपट दिग्दर्शक विश्वनाथ चिंतामण बेडेकर यांचा १९०६ मध्ये जन्म झाला.

  • अभिनेत्री, भरतनाट्यम नर्तक, नृत्यदिग्दर्शक आणि माजी संसद सदस्या वैजयंतीमाला यांचा १९३६ मध्ये जन्म झाला.

  • सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री व निर्माता श्रीदेवी यांचा १९६३ मध्ये जन्म झाला.

  • भारतीय बुद्धीबळातील ९ वे ग्रँडमास्टर संदीपन चंदा यांचा १९८३ मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

  • देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे १७९५ मध्ये निधन झाले.

  • आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचे १९१७ मध्ये निधन झाले.

  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य क्रांतिकारक महिला मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचे १९३६ मध्ये निधन झाले.

  • मराठी भाषिक अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर भावे तथा पु. भा. भावे यांचे १९८० मध्ये निधन झाले.

  • चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे पहिले संचालक गजानन जागीरदार यांचे १९८८ मध्ये निधन झाले.

  • हिरो सायकल चे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचे २०१५ मध्ये निधन झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com