दिनविशेष 13 सप्टेंबर 2023 : पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी

दिनविशेष 13 सप्टेंबर 2023 : पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 13 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 13 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी

२००८: दिल्ली बॉम्बस्फोट - या हल्ल्यात किमान ३० लोकांचे निधन तर १३० जण जखमी झाले.

२००३: पं. दिनकर कैकिणी तानसेन - ज्येष्ठ गायक, यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.

१९९६: श्रीमती इंदुमती पारिख - ज्येष्ठ समाजसेविका, यांना श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार जाहीर.

१९९३: ऑस्लो करार - इस्रायल आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन यांच्यात हा करार झाला.

१९८५: सुपर मारियो ब्रदर्स - हा विडिओ गेम जपानमध्ये प्रकाशित झाला. गेम्सची सुपर मारिओ मालिका सुरू झाली.

१९४८: हैदराबाद मुक्तिसंग्राम - ऑपेरेशन पोलो: हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी भारतीय सैन्य हैदराबादच्या हद्दीत शिरले.

१९४८: मार्गारेट चेस स्मिथ - यांची युनायटेड स्टेट्स सिनेटर म्हणून निवड झाली, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि युनायटेड स्टेट्स सिनेट या दोन्ही ठिकाणी सेवा देणाऱ्या पहिल्या महिला बनल्या.

१९३३: एलिझाबेथ मॅककॉम्ब्स - न्यूझीलंड संसदेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला ठरल्या.

१९२२: अझिजिया, लिबिया - येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील त्यावेळची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

१८९९: बॅटियन शिखर - मॅकेंडर, ऑलियर आणि ब्रोचेरेल यांनी केनिया पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखरावर (५१९९ मी - १७०५८ फूट) पहिल्यांदा चढाई केली.

१८९८: हॅनीबल गुडविन - यांना सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्मचे पेटंट मिळाले.

आज यांचा जन्म

१९३२: डॉ. प्रभा अत्रे - शास्त्रीय गायिका

१८९०: ऍन्टोनी नोगेस - मोनॅको ग्रांप्रीचे स्थापक (निधन: २ ऑगस्ट १९७८)

१८६५: विल्यम बर्डवुड - भारतीय-इंग्रजी फील्डमार्शल (निधन: १७ मे १९५१)

१८५२: पंडित गणेश जनार्दन आगाशे - नामांकित शिक्षक, संस्कृत

आज यांची पुण्यतिथी

२०२२: जसवंत बक्रानिया - भारतीय क्रिकेटपटू

२०२२: एन. एम. जोसेफ - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (जन्म: १८ ऑक्टोबर १९४३)

२०२०: अजित दास - भारतीय चित्रपट अभिनेते (जन्म: २० जानेवारी १९४९)

२०१२: रंगनाथ मिश्रा - भारताचे २१ वे सरन्यायाधीश (जन्म: २५ नोव्हेंबर १९२६)

१९९७: अंजान - प्रसिद्ध गीतकार (जन्म: २८ ऑक्टोबर १९३०)

१९७५: मुदिकॉन्दाम वेंकटरम अय्यर - भारतीय गायक आणि संगीतज्ञ (जन्म: १५ ऑक्टोबर १८९७)

१९७३: सज्जाद झहिर - भारतीय पाकिस्तानी कवी आणि तत्त्ववेक्षक (जन्म: ५ नोव्हेंबर १९०५)

१९७१: केशवराव त्र्यंबक दाते - चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (जन्म: २४ सप्टेंबर १८८९)

१९२९: जतिन दास - स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक (जन्म: २७ ऑक्टोबर १९०४)

१९२६: श्रीधर पाठक - हिंदी साहित्यिक (जन्म: ११ जानेवारी १८५८)

१९१०: रजनीकांत सेन - भारतीय कवी आणि संगीतकार (जन्म: २६ जुलै १८६५)

१८९३: मामा परमानंद - पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (जन्म: ३ जुलै १८३८)

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com