दिनविशेष 14 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 14 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Sakshi Patil

Dinvishesh 14 May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 14 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: भारताने गहू निर्यातीवर तात्काळ बंदी घातली. उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादन अंदाजापेक्षा कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
१९९७: इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना - देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची सुरुवात नोंदणी झाली.
१९६३: कुवेत - देशाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश.
१९६०: एअर इंडिया - कंपनीची मुंबई ते न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.
१९५५: वॉर्सा करार - सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा येथे झाला.
१९४०: दुसरे महायुद्ध - हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९१३: रॉकफेलर फाउंडेशन - सुरवात.
१८८९: नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन - लंडन सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन (London SPCC) चे नामकरण होऊन नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन ची स्थापना
१७९६: देवीची लस - इंग्लंडच्या जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.

आज यांचा जन्म

१९९८: तरुणी सचदेव - लोकप्रसिध्द पेय रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार (निधन: १४ मे २०१२)
१९८४: मार्क झुकरबर्ग - फेसबुकचे सहसंस्थापक
१९८१: प्रणव मिस्त्री - भारतीय संगणक शास्त्रज्ञ
१९२६: डॉ. इंदुताई पटवर्धन - भारतीय समाजसेविका व आनंदग्रामच्या संस्थापिका (निधन: ८ फेब्रुवारी १९९९)
१९२२: फ्रांजो तुुममन - क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: १० डिसेंबर १९९९)
१९०९: वसंत शिंदे - विनोदसम्राट - कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्कार (निधन: ४ जुलै १९९९)
१८९८: हेस्टिंग्ज बांदा - मलावी देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: २५ नोव्हेंबर १९९७)
१८६७: कर्ट आयसनर - जर्मन पत्रकार आणि राजकारणी, बव्हेरियाचे मंत्री-अध्यक्ष (निधन: २१ फेब्रुवारी १९१९)
१६५७: छत्रपती संभाजी महाराज - मराठा साम्राज्याचे २रे छत्रपती (निधन: ११ मार्च १६८९)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: अँड्र्यू सायमंड्स - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (जन्म: ९ जून १९७५)
२०२२: उर्वशी वैद - भारतीय-अमेरिकन LGBT कार्यकर्त्या, वकील आणि लेखिका (जन्म: ८ ऑक्टोबर १९५८)
२०२२: जगदंबा प्रसाद निगम - भारतीय राजकारणी, मध्यप्रदेशचे आमदार (जन्म: २० फेब्रुवारी १९२८)
२०१३: असगर अली इंजिनिअर - भारतीय लेखक (जन्म: १० मार्च १९३९)
२०१२: तरुणी सचदेव - लोकप्रसिध्द पेय रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार (जन्म: १४ मे १९९८)
१९९८: फ्रँक सिनात्रा - हॉलिवूड मधील अभिनेते व गायक (जन्म: १२ डिसेंबर १९१५)
१९९५: ख्रिश्चन बी. अँफिनसेन - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: २६ मार्च १९१६)
१९७८: जगदीश चंद्र माथूर - नाटककार व लेखक (जन्म: १६ जुलै १९१७)
१९६३: डॉ. रघू वीरा - भाषाशास्त्रज्ञ राजकीय नेते (जन्म: ३० डिसेंबर १९०२)
१९४३: हेन्री ला फॉन्टेन, - बेल्जियन वकील आणि लेखक - नोबेल पारितोषिक (जन्म: २२ एप्रिल १८५४)
१९२३: सर नारायण गणेश चंदावरकर - कायदेपंडित, समाजसुधारक (जन्म: २ डिसेंबर १८५५)
१८७९: हेन्री सिवेल - न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान (जन्म: ७ सप्टेंबर १८०७)
१६४३: लुई (१३वा) - फ्रान्सचा राजा (जन्म: २७ सप्टेंबर १६०१)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com