दिनविशेष 14 ऑगस्ट 2023 :जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 14 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 14 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२०१०: पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.
२००६: श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यातचेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.
१९७१: बहारीनला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९५८: एअर इंडियाची दिल्ली - मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
१९४७: पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९४५: दोन अणुबाँबच्या भयावर संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.
१९४३: नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.
१८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश.
१८६२: कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना.
१६६०: मुघल फौजांनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला.
आज यांचा जन्म
१९६८: प्रवीण आमरे - क्रिकेटपटू
१९६२: रमीझ राजा - पाकिस्तानी क्रिकेटपटू समालोचक
१९५७: जॉनी लिव्हर - विनोदी अभिनेते
१९२५: जयवंत दळवी - साहित्यिक, नाटककार वव पत्रकार (निधन: १६ सप्टेंबर १९९४)
१९११: वेदतिरी महाऋषी - भारतीय तत्त्वज्ञानी
१९०७: गोदावरी परुळेकर - भारतीय कम्युनिस्ट नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका (निधन: ८ ऑक्टोबर १९९६)
१८७६: अलेक्झांडर (पहिला) - सर्बियाचा राजा (निधन: ११ जून १९०३)
१७७७: हान्स क्रिस्टियन ओरस्टेड - डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (निधन: ९ मार्च १८५१)
आज यांची पुण्यतिथी
२०२२: राकेश झुनझुनवाला - भारतीय गुंतवणूकदार आणि स्टॉक ट्रेडर, आकासा एअरचे संस्थापक (जन्म: ५ जुलै १९६०)
२०२२: विनायक मेटे - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार (जन्म: ३० जून १९७०)
२०१२: विलासराव देशमुख - महाराष्ट्राचे १४वे मुख्यमंत्री (जन्म: २६ मे १९४५)
२०११: शम्मी कपूर - हिंदी चित्रपट अभिनेते व निर्माते (जन्म: २१ ऑक्टोबर १९३१)
१९८८: एन्झो फेरारी - फेरारी रेस कारचे निर्माते (जन्म: २० फेब्रुवारी १८९८)
१९८४: खाशाबा जाधव - ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर (जन्म: १५ जानेवारी १९२६)
१९५८: जीन फ्रेडरिक जोलिओट - मूलद्रव्याच्या समस्थानिकांचे (Isotopes) संशोधक - नोबेल पुरस्कार (जन्म: १९ मार्च १९००)