दिनविशेष 14 नोव्हेंबर 2023 : पं.नेहरू यांची जयंती; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 14 नोव्हेंबर 2023 : पं.नेहरू यांची जयंती; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Dinvishesh 14 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 14 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

दिनविशेष 14 नोव्हेंबर 2023 : पं.नेहरू यांची जयंती; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊन सेलिब्रेट करा दिवाळी पाडवा

आज काय घडलं?

जागतिक मधुमेह दिन

राष्ट्रीय बाल दिन

२०१३: सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट इंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.

१९९१: जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

१९७५: स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले.

१९७१: मरीनर - ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.

१९६९: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.

१९४०: दुसरे महायुद्ध - जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.

१९२२: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डममध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.

१७७०: जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.

दिनविशेष 14 नोव्हेंबर 2023 : पं.नेहरू यांची जयंती; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
बाल दिनानिमित्त शेअर करा 'या' मराठी शुभेच्छा

आज यांचा जन्म

१९७४: हृषिकेश कानिटकर - क्रिकेटपटू

१९७१: विकास खन्ना - भारतीय शेफ आणि लेखक

१९६४: मनोजसिंग मांडवी - भारतीय राजकारणी, छत्तीसगडचे आमदार (निधन: १६ ऑक्टोबर २०२२)

१९४७: भारतन - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक (निधन: ३० जुलै १९९८)

१९२४: रोहिणी भाटे - कथ्थक नर्तिका (निधन: १० ऑक्टोबर २००८)

१९१९: अनंत काशिनाथ भालेराव - स्वातंत्र्यसैनिक आणि लेखक (निधन: २६ ऑक्टोबर १९९१)

१९१८: मूळगावकर - चित्रकार रघुवीर (निधन: ३० ऑगस्ट १९७६)

१८९१: बिरबल सहानी - पुरावनस्पती शास्त्रज्ञ (निधन: १० एप्रिल १९४९)

१८८९: पं. जवाहरलाल नेहरू - भारताचे पहिले पंतप्रधान - भारतरत्न (निधन: २७ मे १९६४)

१८८८: मौलाना अबुल कलाम आझाद - भारताचे पहिले शिक्षणमंत्री - भारतरत्न (निधन: २२ फेब्रुवारी १९५८)

आज यांची पुण्यतिथी

२०१५: के. ए. गोपालकृष्णन - भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक

२०१३: सुधीर भट - भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक

२०१३: हरि कृष्ण देवसरे - भारतीय पत्रकार आणि लेखक (जन्म: ९ मार्च १९३८)

२०००: प्रा. योगेश्वर अभ्यंकर - भारतीय गीतकार व सर्जनशील कवी (जन्म: ५ नोव्हेंबर १९२९)

१९९३: मणिभाई देसाई - भारतीय ग्रामीण विकासाचे प्रणेते, कार्यकर्ते - पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: २७ एप्रिल १९२०)

१९७७: स्वामी प्रभूपाद - हरेकृष्ण पंथाचे संस्थापक (जन्म: १ सप्टेंबर १८९६)

१९७१: नारायण हरी आपटे - कादंबरीकार, चित्रपट कथालेखक (जन्म: ११ जुलै १८८९)

१९६७: सी. के. नायडू - क्रिकेटपटू (जन्म: ३१ ऑक्टोबर १८९५)

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com