दिनविशेष 15 डिसेंबर 2023 : सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी

दिनविशेष 15 डिसेंबर 2023 : सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी

सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Dinvishesh 15 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 15 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

दिनविशेष 15 डिसेंबर 2023 : सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियाद्वारे शेअर करा त्यांचे प्रेरणादायी विचार

आज काय घडलं?

आंतरराष्ट्रीय चहा दिन

२००३: फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.

१९९८: बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.

१९९१: चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.

१९७६: सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

१९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला.

१९७०: व्हेनेरा-७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले.

१९६०: नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान,संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.

१९४१: जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.

१८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा ईस्ट इंडिया कंपनीकडे दिला.

आज यांचा जन्म

१९७६: भायचुंग भुतिया - भारतीय फुटबॉलपटू - पद्मश्री, अर्जुना पुरस्कार

१९७५: सिद्धान्त वीर सुर्यवंशी - भारतीय अभिनेते (निधन: ११ नोव्हेंबर २०२२)

१९३७: प्र. कल्याण काळे - संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक

१९३५: उषा मंगेशकर - पार्श्वगायिका व संगीतकार

१९३३: बापू - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक (निधन: ३१ ऑगस्ट २०१४)

१९३३: डॉ. प्रभाकर मांडे - लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक

१९३२: टी. एन. शेषन - प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी

१९२६: बबन प्रभू - प्रहसन लेखक व अभिनेते

१९२४: नेकचंद सैनी - भारतीय मूर्तिकार - पद्मश्री (निधन: १२ जून २०१५)

१९०८: स्वामी रंगनाथानंद - आध्यात्मिक गुरू, रामकृष्ण मठ आणि मिशनचे १३वे अध्यक्ष (निधन: २५ एप्रिल २००५)

१९०५: इरावती कर्वे - मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: ११ ऑगस्ट १९७०)

१९०३: स्वामी स्वरुपानंद - (निधन: १५ ऑगस्ट १९७४)

आज यांची पुण्यतिथी

१९८९: दप्तेंद प्रमानिक - भारतीय उद्योजिका (जन्म: १८ जुलै १९१०)

१९६६: वॉल्ट डिस्ने - मिकी माऊसचे जनक, डिस्ने कंपनीचे संस्थापक - अकादमी पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार (जन्म: ५ डिसेंबर १९०१)

१९५०: सरदार वल्लभभाई पटेल - भारताचे पहिले उपपंतप्रधान - भारतरत्न (मरणोत्तर) (जन्म: ३१ ऑक्टोबर १८७५)

१७४९: छत्रपती शाहू महाराज (पहिले) - मराठा साम्राज्याचे ५वे छत्रपती (जन्म: १८ मे १६८२)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com