दिनविशेष 15 जुलै 2023 : ट्विटरचा बर्थडे; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 15 जुलै 2023 : ट्विटरचा बर्थडे; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 15 July 2023 : सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 15 जुलै या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२०: बिटकॉइन घोटाळ्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख राजकीय व्यक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची ट्विटर अकाउंट हॅक झाली.

२००६: ट्विटर - हा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.

१९९७: महेशचंद्र मेहता - यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

१९९६: पांडुरंग शास्त्री आठवले - यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

१९६२: ज्ञानप्रबोधिनी संस्था, पुणे - सुरवात.

१९५५: मैनाऊ जाहीरनामा - आण्विक अस्त्रांवर बंदी घालण्यासाठी ५८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्रज्ञानीं या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या.

आज यांचा जन्म

१९९२: वैशाली टक्कर - भारतीय अभिनेत्री (निधन: १५ ऑक्टोबर २०२२)

१९४९: माधव कोंडविलकर - दलित साहित्यिक

१९३७: श्री प्रभाज जोशी - भारतीय पत्रकार (निधन: ५ नोव्हेंबर २००९)

१९३५: भगीरथ प्रसाद त्रिपाठी - भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी - पद्मश्री (निधन: ११ मे २०२२)

१९३३: एम. टी. वासुदेवन नायर - भारतीय लेखक आणि पटकथालेखक

१९३२: नरहर कुरुंदकर - विद्वान, टीकाकार आणि लेखक (निधन: १० फेब्रुवारी १९८२)

१९२७: प्रा. शिवाजीराव भोसले - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (निधन: २९ जून २०१०)

१९०४: मोगुबाई कुर्डीकर - जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका, गानतपस्विनी - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: १० फेब्रुवारी २००१)

१९०३: के. कामराज - तामिळ नाडूचे २रे मुख्यमंत्री व स्वातंत्र्यसेनानी - भारतरत्न (निधन: २ ऑक्टोबर १९७५)

१६११: मिर्झाराजे जयसिंग - जयपूरचे राजे (निधन: २८ ऑगस्ट १६६७)

आज यांची पुण्यतिथी

२००४: बानू कोयाजी - कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या - पद्म भूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)

१९९९: जगदीश गोडबोले - पर्यावरणवादी लेखक

१९९९: इंदुताई टिळक - सामाजिक कार्यकर्त्या

१९९८: ताराचंद परमार - स्वातंत्र्यसैनिक

१९९१: जगन्नाथराव जोशी - गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक

१९७९: गुस्तावोदियाझ ओर्दाझ - मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष

१९६७: बालगंधर्व - गायक व नट - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: २६ जून १८८८)

१९५८: नुरी अल-सैद - इराक देशाचे ८वेळा पंतप्रधान

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com