दिनविशेष 15 सप्टेंबर 2023 : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 15 सप्टेंबर 2023 : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 15 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 15 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

अभियंता दिन

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन

२०२२: SAFF U-19 Championship 2022 - दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (South Asian Football Federation) अंडर-17 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा नेपाळविरुद्ध विजय.

२०१३: निना दावुलुरी - या भारतीय वंशाच्या पहिल्या मिस अमेरिका बनल्या.

२००८: लेहमन ब्रदर्स - या वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी जाहीर केली.

१९८१: सँड्रा डे ओ'कॉनर - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती बनल्या.

१९७८: मुहम्मद अली - तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे पहिले बॉक्सर बनले.

१९५३: श्रीमती विजयालक्ष्मी पंडित - यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.

१९४८: ऑपरेशन पोलो - भारतीय सैन्याने जालना, लातूर, मोमिनाबाद, सुर्‍यापेट आणि नरकटपल्ली ही शहरे ताब्यात घेतली.

१९४८: एफ-८६ सेबर - जेटविमानाने ताशी १,०८० किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.

आज यांचा जन्म

१९५०: राजीव मल्होत्रा - भारतीय लेखक

१९३९: सुब्रमण्यम स्वामी - अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ

१९३५: दया पवार - सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक (निधन: २० डिसेंबर १९९६)

१९२६: अशोक सिंघल - विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष (निधन: १७ नोव्हेंबर २०१५)

१९२१: दाजी भाटवडेकर - रंगभूमी अभिनेते (निधन: २६ डिसेंबर २००६)

१९०९: आप्पा कुंभार - स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील नेते (निधन: २३ डिसेंबर १९९८)

१९०९: सी. एन. अण्णादुराई - तामिळनाडूचे ७वे मुख्यमंत्री (निधन: ३ फेब्रुवारी १९६९)

१९०५: राजकुमार वर्मा - भारतीय नाटककार, समीक्षक व कवी - पद्म भूषण (निधन: ५ ऑक्टोबर १९९०)

१८६१: सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया - स्थापत्य अभियंता आणि राजकारणी - भारतरत्न (निधन: १४ एप्रिल १९६२)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: सदाशिव पाटील - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: १० ऑक्टोबर १९३३)

२०१२: के. एस. सुदर्शन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक (जन्म: १८ जून १९३१)

२००८: गंगाधर गाडगीळ - साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: २५ ऑगस्ट १९२३)

१९९८: विश्वनाथ लवंदे - गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com