दिनविशेष 17 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 17 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 17 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 17 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.

१९९७: उस्ताद अली अकबर खान यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान.

१९८८: पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणिअमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.

१९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.

१९४५: इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.

१८३६: रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस ऍक्ट ब्रिटिश संसदेने मान्यता दिलेल्या कायद्याची १८३७ पासून अंमलबजावणी सुरू झाली.

१६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.

आज यांचा जन्म

१९४९: निनाद बेडेकर - भारतीय इतिहासकार, लेखक (निधन: १० मे २०१५)

१९४१: भीम सिंग - भारतीय राजकारणी, खासदार आणि जम्मू आणि काश्मीरचे आमदार (निधन: ३१ मे २०२२)

१९३५ : पी. एस. थिरुवेंगडम - भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे आमदार (निधन: १४ सप्टेंबर २०२२)

१९१६: डॉ. विनायक पेंडसे - ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (निधन: १९ ऑगस्ट १९७५)

१९१६: डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे - शिक्षणतज्ञ, लेखक, पत्रकार (निधन: १९ ऑगस्ट १९७५)

१९०५: शंकर गणेश दाते - ग्रंथसूचीकार (निधन: १० डिसेंबर १९६४)

१८८८: बाबूराव जगताप - श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणेचे संस्थापक

१८६६: मीर महबूब अली खान - हैदराबादचा सहावा निजाम (निधन: २९ ऑगस्ट १९११)

आज यांची पुण्यतिथी

१९०९: मदनलाल धिंग्रा - क्रांतिवीर (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)

१३०४: गोफुकाकुसा - जपानी सम्राट

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com