दिनविशेष 17 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 17 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 17 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 17 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन

जागतिक पूर्व परिपक्वता दिन

१९९६: पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून निवड.

१९९४: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेऱ्या पूर्ण करून नवा विक्रम केला.

१९९२: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबाई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

१९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.

१९५०: ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.

१९३२: तिसऱ्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

१८६९: भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणाऱ्या सुएझ कालव्याचे उद्घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.

१८३१: ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.

आज यांचा जन्म

१९८२: युसूफ पठाण - भारतीय क्रिकेटपटू

१९४९: अंजन दास - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: २ जून २०१४)

१९३८: रत्नाकर मतकरी - लेखक, नाटककार, निर्माते

१९३२: बेबी शकुंतला - अभिनेत्री (निधन: १८ जानेवारी २०१५)

१९२०: मिथुन गणेशन - भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक (निधन: २२ मार्च २००२)

आज यांची पुण्यतिथी

२०१५: अशोक सिंघल - विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष (जन्म: १५ सप्टेंबर १९२६)

२०१२: पॉंटि चड्डा - भारतीय उद्योगपती (जन्म: २२ ऑक्टोबर १९५७)

२०१२: बाळासाहेब ठाकरे - हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख (जन्म: २३ जानेवारी १९२६)

२००३: सुरजित बिंद्राखिया - भारतीय गायक (जन्म: १५ एप्रिल १९६२)

१९६१: कुसुमावती देशपांडे - श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक (जन्म: १० नोव्हेंबर १९०४)

१९३१: हरप्रसाद शास्त्री - संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार (जन्म: ६ डिसेंबर १८५३)

१९२८: लाला लजपत राय - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पंजाब केसरी (जन्म: २८ जानेवारी १८६५)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com